IPL 2022: गुजरात टायटन्सवर विजय मिळवण्यासाठी धोनी झाला फिरकीपटू, नेट प्रॅक्टिस करतानाचा Video व्हायरल

चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आज आमनेसामने येणार आहेत. हा सामना सुरू होण्यासाठी काहीच मिनिटं शिल्लक राहिली आहेत. यावेळी चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी गोलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. गुजरात टायटन्सवर विजय मिळवण्यासाठी धोनी गोलंदाजीचा सराव नेटमध्ये करत आहे. तसेच त्याचा सराव करतानाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl)

आयपीएल २०२२ च्या २९ व्या सामन्यात, गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जसमोर कर्णधार हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सचे आव्हान आहे, जे सध्या गुणतालिकेत शीर्षस्थानी आहेत. यावेळी चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत ९ व्या स्थानावर आहे.

गुजरातविरुद्धच्या सामन्यापूर्वी चेन्नईने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून धोनीच्या गोलंदाजीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धोनी नेटमध्ये लेग स्पीनचा सराव करताना दिसत आहे. धोनीला फलंदाजी करताना पाहून चाहत्यांनी सुद्धा भरघोस प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यापैकी एका चाहत्याने म्हटलंय की, आर. अश्विन धोनी आणि दुसऱ्या चाहत्याने म्हटलंय की, मुरलीधरन धोनी. याचाच अर्थ धोनीची तुलना ही अश्विन आणि मुरलीधरन यांच्याशी केली आहे.

मागील हंगामात जेतेपद पटकावणाऱ्या चेन्नईचा संघ यंदाच्या हंगामात वाईट परिस्थितीतून जात आहे. संघाला अपेक्षेप्रमाणे स्पर्धेची सुरुवात चांगली करता आलेली नाहीये. याआधी दीपक चहरमुळे सीएसकेला मोठा धक्का बसला होता. कारण दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

तसेच चेन्नई संघ फलंदाजी आणि गोलंदाजीतही पूर्णपणे फ्लॉप झाला आहे. सीएसकेने आतापर्यंत पाच सामन्यांपैकी फक्त एकच विजय मिळवला आहे. दुसरीकडे, गुजरातबद्दल बोलायचे झाले तर, आयपीएलच्या या हंगामात पदार्पण करणाऱ्या या संघाने आतापर्यंत सर्वांनाच प्रभावित केले आहे. गुजरातने आतापर्यंत ५ पैकी ४ सामने जिंकले आहेत.


हेही वाचा : राम आणि हनुमानच्या नावावर दंगली घडवण्याचे मनसुबे, पंतप्रधान यावर गप्प का? – संजय राऊत