घरक्रीडामुलानीमुळे मुंबईला आघाडीची संधी!

मुलानीमुळे मुंबईला आघाडीची संधी!

Subscribe

४३१ धावांचे उत्तर देताना बडोदा ९ बाद ३०१

शम्स मुलानीच्या अष्टपैलू खेळामुळे बडोद्याविरुद्धच्या रणजी करंडकाच्या सामन्यात मुंबईला पहिल्या डावात आघाडी घेण्याची संधी आहे. मुंबईने आपल्या पहिल्या डावात ४३१ धावा केल्या, ज्याचे उत्तर देताना दुसर्‍या दिवसअखेर बडोद्याची ९ बाद ३०१ अशी धावसंख्या होती. त्यामुळे ते १३० धावांनी पिछाडीवर असून त्यांची केवळ १ विकेट शिल्लक आहे.

दुसर्‍या दिवशी ८ बाद ३६२ वरुन पुढे खेळताना मुंबईच्या अखेरच्या दोन जोड्यांनी झुंजार फलंदाजी करत ६९ धावांची भर घातली. त्यामुळे मुंबईने पहिल्या डावात ४३१ धावा केल्या. डावखुर्‍या शम्स मुलानीने १४१ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकार लगावत ८९ धावांची खेळी करत मुंबईला ४०० धावांचा टप्पा पार करुन दिला. त्याला तळाच्या शशांक अत्तारडे (२२) आणि तुषार देशपांडे (१८) यांची उत्तम साथ लाभली.

- Advertisement -

बडोद्याने आपल्या डावाची चांगली सुरुवात केली. त्यांची १ बाद ११२ अशी धावसंख्या होती. मात्र, यानंतर डावखुरा फिरकीपटू मुलानीने सलग पाच फलंदाजांना माघारी पाठवत बडोद्याच्या डावाला खिंडार पाडले. त्यांचा सलामीवीर केदार देवधरने मात्र एक बाजू लावून धरत १८४ चेंडूत नाबाद १५४ धावा केल्या. परंतु, त्याला इतरांची साथ न लाभल्याने दुसर्‍या दिवसअखेर बडोद्याची ९ बाद ३०१ अशी धावसंख्या होती.

संक्षिप्त धावफलक – मुंबई : पहिला डाव – सर्वबाद ४३१ (शम्स मुलानी ८९, अजिंक्य रहाणे ७९; युसूफ पठाण ३/२६) वि. बडोदा : पहिला डाव – ९ बाद ३०१ (केदार देवधर नाबाद १५४; शम्स मुलानी ५/९९, शशांक अत्तारडे २/४८).

- Advertisement -

गणेश सतीशचे शतक

अनुभवी गणेश सतीशच्या अप्रतिम शतकामुळे गतविजेत्या विदर्भाला रणजी करंडकाच्या आंध्रविरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावात आघाडी मिळाली. आंध्रचा पहिला डाव २११ धावांवर आटोपला. याचे उत्तर देताना विदर्भाची ३ बाद ६१ अशी अवस्था होती. मात्र, सतीश आणि मोहित काळे या चौथ्या जोडीने १८४ धावांची भागीदारी करत विदर्भाचा डाव सावरला. सतीशने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १३ वे शतक झळकावले, पण काळेला शतक करता आले नाही. त्याला ८२ धावांवर चिपुरापल्ली स्टिफनने पायचीत पकडले. विदर्भाच्या चार पैकी तीन विकेट्स स्टिफननेच घेतल्या. दुसर्‍या दिवसअखेर विदर्भाची ४ बाद २६८ अशी धावसंख्या होती आणि त्यांच्याकडे ५७ धावांची आघाडी होती. सतीश ११३, तर अक्षय वाडकर ९ धावांवर नाबाद होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -