घरक्रीडाशिवमुद्रा प्रतिष्ठान, जय दत्तगुरुचा चौथ्या फेरीत प्रवेश

शिवमुद्रा प्रतिष्ठान, जय दत्तगुरुचा चौथ्या फेरीत प्रवेश

Subscribe

मुंबई शहर जिल्हा निवड चाचणी कबड्डी

मुंबई शहर कबड्डी असोसिएशन आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या सब-ज्युनियर गटात शिवमुद्रा प्रतिष्ठान, जय दत्तगुरु कबड्डी संघाने, तर प्रथम श्रेणी व्यावसायिक पुरुषांत वैभव टूर्स अँड ट्रॅव्हल, शिवाज इंटरप्रायझेस, मुंबई तामिळ कबड्डी संघ यांनी चौथ्या फेरीत प्रवेश केला. सब-ज्युनियर गटाच्या तिसर्‍या फेरीत शिवमुद्रा प्रतिष्ठानने ओम ज्ञानदीप मंडळाचा ६०-३४ असा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली. विशाल लाड, यश बेले यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत शिवमुद्राला मध्यंतराला ३४-५ अशी भली भक्कम आघाडी मिळवून दिली. त्यानंतरही त्यांनी दमदार खेळ सुरु ठेवत हा सामना जिंकला.

दुसरीकडे जय दत्तगुरु कबड्डी संघाने सिद्धीप्रभा फाऊंडेशनवर ४९-२८ अशी मात केली. या सामन्याच्या मध्यंतराला जय दत्तगुरूकडे २६-१६ अशी आघाडी होती. त्यांच्या या विजयात सिद्धेश नेरुरकर, स्वप्नील पाटील हे खेळाडू चमकले. वीर बजरंग कबड्डी संघाने यश क्रीडा मंडळावर ६०-३४ अशी मात केली. या सामन्याच्या पहिल्या डावात २१-१४ अशी आघाडी घेणार्‍या वीर बजरंगच्या दीपक सूर्यवंशी, श्रीराज भडसाळे यांनी या सामन्यात अप्रतिम खेळ केला.

- Advertisement -

प्रथम श्रेणी व्यावसायिक पुरुषांच्या तिसर्‍या फेरीच्या सामन्यात वैभव टूर्स अँड ट्रॅव्हलने मध्यंतरातील ८-१६ अशी पिछाडी भरून काढत विनायक इंटरप्रायझेसवर ३७-२७ अशी मात करत चौथ्या फेरीत धडक दिली. श्री सनकुळकर, निखिल धामणे यांनी चांगला खेळ करत विनायक इंटरप्रायझेसला ८ गुणांची आघाडी मिळवून दिली होती. मात्र, उत्तरार्धात वैभव टूर्सच्या राहुल मोरे, सुधीर सावंत यांनी जोरदार पुनरागमन केल्याने वैभवने हा सामना जिंकला. शिवाज इंटरप्रायझेसने राजेश बोराडे, आदिनाथ घुले यांच्या चढाई-पकडीच्या खेळाच्या जोरावर श्री समर्थ इंटरप्रायझेसला ३५-३३ असे नमवत आगेकूच केली. मुंबई तामिळ कबड्डी संघाने सायली असोसिएटला ५६-४२ असे पराभूत केले. पहिल्या डावात १८-९ अशी आघाडी घेणार्‍या तामिळकडून सुरेश नाडार, आयप्पा यांनी अप्रतिम खेळ केला.

तिसर्‍या फेरीचे इतर निकाल संक्षिप्त.

व्यावसायिक प्रथम श्रेणी पुरुष : १] टी.बी.एस स्पोर्ट्स विजयी वि. मातोश्री कन्सल्टंसी (२६-१२), २] चिनू स्पोर्ट्स विजयी वि. एस.आर.जे ग्रुप (१४-०७).

- Advertisement -

सब-ज्युनियर गट : १] स्वयंस्वराज क्रीडा मंडळ विजयी वि. जागृती सेवा मंडळ (७१-३९), २] वीर संताजी क्रीडा मंडळ विजयी वि. यश क्रीडा मंडळ (५१-२८), ३] अमर संदेश स्पोर्ट्स विजयी वि. श्री साई क्लब (५८-२१).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -