घरक्रीडाIPL 2023 : मुंबई अंतिम फेरीपासून एक पाऊल दूर, गुजरातसोबत होणार दुसरा...

IPL 2023 : मुंबई अंतिम फेरीपासून एक पाऊल दूर, गुजरातसोबत होणार दुसरा क्वालिफायर सामना

Subscribe

बुधवारी झालेल्या सामन्यात मुंबईच्या संघाने लखनऊ संघाचा 81 धावांनी पराभव केला. त्यामुळे आता अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी मुंबई संघाला गुजरात संघाचा सामना करावा लागणार आहे.

IPL 2023 च्या यंदाच्या पर्वाचा अंतिम सामना 28 मे रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. या पर्वाच्या अंतिम सामन्यात महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई संघाने प्रवेश केला आहे. प्लेऑफच्या दुसऱ्या फेरीत काल बुधवारी (ता. 24 मे) मुंबई आणि लखनऊ संघाचा सामना खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने उत्तम खेळी करत दुसऱ्या क्वालिफायर राऊंडमध्ये प्रवेळ केला आहे. तर लखनऊचा आयपीएलमधील प्रवास इथेच संपला आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात मुंबईच्या संघाने लखनऊ संघाचा 81 धावांनी पराभव केला. त्यामुळे आता अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी मुंबई संघाला गुजरात संघाचा सामना करावा लागणार आहे. (Mumbai, one step away from the final, will face Gujarat in the second qualifier)

हेही वाचा – HSC Result : 12वी बोर्डाच्या निकालाला काही तास बाकी, असा पाहा रिझल्ट

- Advertisement -

बुधवारी झालेल्या सामन्यात मुंबई संघाचा गोलंदाज आकाश मधवालने लखनऊच्या पाच खेळाडूंना बाद करत त्यांचा अर्धा संघ तंबूत पाठवला. आकाशने 3.3 षटकात केवळ पाच धावा देत पाच बळी घेतल्याने तो या सामन्यातील हिरो ठरला आहे. या सामन्यात सर्वच खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत दुसऱ्या क्वालिफायर फेरीत प्रवेश मिळवला आहे. लखनऊ विरूद्धच्या सामन्यात कॅमेरॉन ग्रीनने सर्वाधिक 41 धावा केल्या. पण मुंबईच्या गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे हा विजय मिळवता आला.

आता उद्या शुक्रवारी (ता. 26 मे) अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी मुंबई विरूद्ध गुजरात संघांत सामना खेळला जाणार आहे. त्यामुळे मुंबई अंतिम फेरीपासून फक्त एक पाऊल दूर आहे. गुजरात संघाचा चेन्नईने पराभव केल्याने आता विजयी झालेल्या मुंबईचा आणि गुजरात अंतिम फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी लढत देणार आहे.

- Advertisement -

गुजरात संघाने यंदाच्या IPLमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर राहिले आहेत. गुजरात संघातील सर्वच खेळाडूंनी उत्तम खेळत सामने जिंकले असल्याने मुंबईसमोर गुजरातला हरविण्याचे मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात गुजरात किंवा मुंबईमधील कोणता संघ विजयी होऊन अंतिम सामन्यात चेन्नई विरूद्ध सामना खेळेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -