नरेंद्र छाजेड राज्य टेबल टेनिस संघटनेच्या उपाध्यक्षपदी

भंडारी, भरवीरकर कार्यकारिणी सदस्यपदी

शिवछत्रपती पुरस्कारविजेते आणि नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड यांची राज्य टेबल टेनिस संघटनेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

त्याचबरोबर शिवछत्रपती पुरस्कार विजेते शेखर भंडारी यांची कार्यकारिणी सदस्यपदी, तसेच राजेश भरवीरकर यांची असोसिएट सदस्य म्हणून कार्यकारिणीवर बिनविरोध निवड झाली. माजी राष्ट्रीय खेळाडू संजय मोडक यांची राज्य मानांकन समिती चेअरमनपदी निवड करण्यात आली.

प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात नाशिकला राज्य संघटनेत स्थान मिळाले आहे. या निवडीबद्दल जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक, शिवछत्रपती पुरस्कारविजेते अविनाश खैरनार, संजय होळकर, आनंद खरे, अशोक दुधारे, राजीव शिंदे, तसेच अनिल चुंबळे, राधेशाम मुंदडा, नितीन मोडक, राकेश पाटील, सुरेंद्र साळेकर आदींनी अभिनंदन केले.

याच निवडणुकीत राजीव बोडस (पुणे) यांची अध्यक्षपदी, तर सहसचिवपदी प्रकाश तुळपुळे (पुणे), प्रकाश जसानी (गोंदिया) यांची, कोषाध्यपदी संजय कडू (रायगड) यांची बिनविरोध निवड झाली.