घरक्रीडाइको सायक्लोथॉनमध्ये नाशिकच्या सायकलपटूंना यश

इको सायक्लोथॉनमध्ये नाशिकच्या सायकलपटूंना यश

Subscribe

ठाणे जिल्हा सायकलिंग असो. तर्फे पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आयोजित इको सायक्लोथॉन 2019 या राज्यस्तरीय स्पर्धेत नाशिकच्या सायकलपटूंनी यश मिळवले आहे. बदलापूर येथे बुधवारी (दि. 5) झालेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत (10 किमी) 17 वर्षाखालील मुलांत ओम महाजन याने दुसरा, निसर्ग भामरेने तिसरा तर सोहम नागरे याने सिंगल गिअर सायकलवर मतब्बरांना मात देत पाचवा क्रमांक पटकावला.

तर मुलींमध्ये रितु भामरे द्वितीय, प्रांजळ चव्हाण हिने पाचवा क्रमांकावर राहिली. खुल्या गटात 60 किमी अंतराच्या स्पर्धेत भारत सोनवणे याने पाचवा तर मनोज महाले याने नववा क्रमांकावर राहत नाशिकची पताका लावली. विशेष म्हणजे 14 वर्षाखालील स्पर्धा केवळ ठाणे जिल्ह्यातील सायकल खेळाडूंसाठी असल्याने नाशिककर रितू भामरे या 13 वर्षीय सायकलपटूने 17 वर्षाखालील गटात सहभागी होत दुसरा क्रमांक पटकावला आहे.

- Advertisement -

या गटात राज्यभरातून आलेल्या तसेच राष्ट्रीय स्पर्धा गाजवलेल्या खेळाडूंना मागे टाकत रितूने हे यश मिळवले आहे. सर्व खेळाडूंचे नाशिक सायकलिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करत पुढील स्पर्धांसाठी सदिच्छा दिल्या आहेत. या स्पर्धेनंतर राज्य आणि देशभरात विविध सायकलिंग स्पर्धांना सुरुवात होत असते. सायकल चालवा पर्यावरण वाचवा असा संदेश देणाऱ्या ड्रीम रन सायकल रॅलीचे आयोजनही यावेळी करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -