घरक्रीडास्पोर्ट शूज खरेदीसाठी २०० रूपयात केली गोलंदाजी, नवदीप सैनीचे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण

स्पोर्ट शूज खरेदीसाठी २०० रूपयात केली गोलंदाजी, नवदीप सैनीचे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण

Subscribe

सेहवाग, कोहली, गंभीरला बघताना स्टेडिअम गेटवरून हटकण्याची मिळाली वागणूक

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफिमध्ये भारताचे कसोटी सामन्यात प्रतिनिधीत्व करणारा नवदीप सैनी हा २९९ वा टेस्ट क्रिकेटपटू ठरलेला आहे. दुसऱ्या कसोटीत जखमी झालेल्या उमेश यादवच्या जागेवर सैनीला संधी मिळाली आहे. नवदीप सैनीच्या आयुष्यात एक असा प्रसंग होता जेव्हा विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि विराट कोहली यांना फक्त एकदा पाहता यावे म्हणून तो स्टेडिअम जवळ गेला होता. पण ही भेट काही घडून आली नाही. स्टेडिअमच्या गेटवरूनच गार्डने सैनीला हाकलून दिले होते. पण आज त्याच सैनिने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आपल्या गोलंदाजीने चकवा दिला आहे. आपल्या कसोटी पदार्पणातल्या पहिल्याच इनिंगमध्ये विकेट घेत त्याने आपल्या कसोटी क्रिकेटमधील खाते उघडले आहे.

हरियाणातल्या करनाल जिल्ह्यात जन्मलेल्या या जलदगती गोलंदाजाने गेल्याच वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत सैनी सात एकदिवसीय सामने तर १० टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. अतिशय वेगवान गोलंदाजीसाठी सैनी ओळखला जातो. आयपीएलमध्ये सैनी विराट कोहलीच्या संघातून आरसीबीसाठी खेळतो. आरसीबीच्या संघात चांगल्या कामगिरीमुळेच हा सैनी चर्चेत आला. सैनी हा दिल्लीच्या रणजी टीमचाही सदस्य राहिलेला आहे.

- Advertisement -

अतिशय गरीब घरातून आलेला सैनी आज कसोटी पदार्पण करत आहे. वडील सरकारी नोकरीत ड्रायव्हर म्हणून काम करत होते, पण नेहमीच वडिलांनी माझा आत्मविश्वास वाढवला असे सांगायला तो विसरत नाही. अनेक डोंगराएवढी संकटे समोर उभी राहिलेली असतानाही नवदीपने आपला क्रिकेटचा प्रवास सुरूच ठेवला. एकेकाळी स्पोर्ट शूज घ्यायलाही त्याच्याकडे पैसे नव्हते. पण छोट्या छोट्या सामन्यांमध्ये गोलंदाजी करून त्याने प्रत्येक सामन्यात आपली चमक दाखवली. या सामन्यांसाठी अवघे २०० रूपये मिळत असतानाही तो न थांबता गोलंदाजी करत राहिला. आपल्या गोलंदाजीने सैनीने सर्वांनाच प्रभावित केले.

नवदीप सैनी वृत्तपत्रात जेव्हा जेव्हा गंभीर, सेहवागचा फोटो बघायचा तेव्हा त्यांच्या कामगिरीचा प्रभाव सैनीवर असायचा. एकदा दिल्लीतला रणजी सामना पहायला सैनी पोहचला, त्याठिकाणी मात्र सैनीचे नशीब उघडले. करनाल प्रीमिअर लीगच्या मॅचमध्ये सुमित नरवाल हे सैनीच्या गोलंदाजीने खूपच प्रभावित झाले होते. याच सामन्या दरम्यान नरवाल यांनी सैनीची भेट गौतम गंभीरसोबत घालून दिली. गंभीरने सैनीची गोलंदाजी पाहून दिल्लीच्या संघात लगेच त्याचा समावेश केला. त्यानंतर सैनीने पुन्हा कधीच मागे वळून पाहिले नाही.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -