Eco friendly bappa Competition
घर क्रीडा बॉक्सिंगमध्ये निखतकडून देशाला सुवर्णपदक, आनंद महिंद्रांनी दिली थार गिफ्ट

बॉक्सिंगमध्ये निखतकडून देशाला सुवर्णपदक, आनंद महिंद्रांनी दिली थार गिफ्ट

Subscribe

जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या निखत झरीनने देशाला सुवर्णपदक मिळवून दिलं. त्यामुळे महिंद्रा अँड महिंद्राने निखत झरीनला नवीन महिंद्रा थार गिफ्ट दिली आहे. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात निखत झरीनने व्हिएतनामच्या बॉक्सरला ५-० ने पराभूत करून सुवर्णपदक पटकावले आहे. त्यानंतर तिला एक लाख डॉलर बक्षीस रक्कम म्हणून मिळाली. या रक्कमेतून निखत मर्सिडीज लक्झरी कार घेण्याच्या विचारात होती. परंतु महिंद्रा थार मिळाल्यानंतर तिने आपला विचार बदलला. यासंदर्भातील माहिती महिंद्रा यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली. तसेच निखतचेही अभिनंदन केले.

निखत झरीनने महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२३च्या ५० किलो वजन गटाच्या अंतिम फेरीत व्हिएतनामची दोन वेळची आशियाई चॅम्पियन गुयेन थी टॅमचा पराभव केला. पहिल्या फेरीत दोघांमध्ये चुरशीची लढत झाली आणि टॅमने जोरदार मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला पण निर्णय निखतच्या बाजूने गेला. मेरी कोमनंतर दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी दुसरी भारतीय ठरली आहे.

- Advertisement -

याआधी महिंद्राने अनेक खेळाडूला आपली कार गिफ्ट रुपात दिली आहे. ज्यामध्ये ऑलिम्पिक मेडल विजेता नीरज चोप्रा, सुमित अंतिल यांचाही समावेश आहे. या खेळाडूंना महिंद्राने पर्सनलाइज्ड एक्सयूवी700 एसयूव्ही गिफ्ट केली होती. निखतला गिफ्ट केलेली थार काळ्या रंगाची आहे.


हेही वाचा : World Boxing Championship : भारताला चार सुवर्णपदक, निखत-लवलिना यांची शेवटच्या दिवशी


- Advertisement -

 

- Advertisment -