घरक्रीडाNZ vs BAN: बांगलादेशने रचला इतिहास, विश्वविजेत्या न्यूझीलंडवर मिळवला दणदणीत विजय

NZ vs BAN: बांगलादेशने रचला इतिहास, विश्वविजेत्या न्यूझीलंडवर मिळवला दणदणीत विजय

Subscribe

यापूर्वी बांगलादेशने तिन्ही प्रकारात न्यझीलंडमध्ये खेळलेल्या ३४ सामन्यांपैकी फक्त एक सामना स्कॉटलंडविरुद्ध जिंकला होता. तसेच अनुभवी शाकिब अल हसन, तामीम इकबाल आणि महमुदुल्लाहच्या गैरहजेरीमध्ये विजयाची अपेक्षा नव्हती.

बांगलादेशने न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) पहिला कसोटी सामाना 8 विकेट्सनं जिंकून इतिहास रचला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या हंगामात विजेता संघ न्यूझीलंड 5 वर्ष आणि 17 कसोटी सामन्यानंतर स्वगृहीच पराभूत झाला आहे. बांगलादेशने पहिल्यांदाचा न्यझीलंडचा पराभव (Bangladesh First win v New Zealand) करुन पहिला सामना जिंकला आहे. बांगलादेशचा न्यूझीलंडवर पहिलाच विजय असून आतापर्यंत कोणत्याही प्रकाराच्या सामन्यात(all formats) बांगलादेशनं इंग्लंविरुद्ध विजय मिळवला नव्हता. यामुळे बांगलादेशसाठी हा ऐतिहासिक विजय असून याचे श्रेय इबादत हुसैन याला जात असून त्याने एका डावात 6 विकेट घेतले आहेत. पहिल्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी न्यूझीलंडचा दुसरा डाव 169 धावांवरच आटोपला होता. बांगलादेशने 40 धावांचे लक्ष्य दोन विकेट गमावून पूर्ण केले.

बांगलादेशला विजयाच्या उंबरठ्यावर कर्णधार मोमिनुल हक नाबाद 13 आणि मुशफिकर रहीम नाबाद 5 या जोडीने नेले आहे. बांगलादेशची सुरुवात खराब प्रदर्शनाने झाली होती. दुसऱ्याच षटकात सलामीवीर शदमान इस्लाम 3 धावांवर टिम साउदीच्या चेंडूवर बाद झाला. काईल जैमिसनने पहिल्या डावात अर्धशतक झळकवणाऱ्या नजमुल हसन शंटोला पव्हेलियनमध्ये पाठवले. हक आणि रहीमच्या जोडीने बांगलादेशला तिसरा झटका लागू दिला नाही. रहीमने बांगलादेशसाठी विजयाचा चौकार ठोकला.

- Advertisement -

शेवटच्या दिवशी न्यूझीलंडने 147 धावा आणि 5 विकेटच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. सामनावीर इबादत हुसेनचा चौथ्या दिवशी खेळ सुरु झाला अन् नाबाद असलेल्या रॉस टेलरला 40 धावांवर बाद केले. त्यानंतर इबादतने गडी बाद करण्यास सुरुवात केली. त्याने न्यूझीलंडच्या शेवटच्या 5 विकेट अवघ्या 16 धावांत पाडल्या. तस्कीन अहमदने 3 गडी बाद केले तर महेदीने 1 गडी बाद केला आहे. अशा प्रकारे न्यूझीलंडचा पूर्ण डाव फक्त 169 धावांवर संपला.

यापूर्वी बांगलादेशने तिन्ही प्रकारात न्यझीलंडमध्ये खेळलेल्या ३४ सामन्यांपैकी फक्त एक सामना स्कॉटलंडविरुद्ध जिंकला होता. तसेच अनुभवी शाकिब अल हसन, तामीम इकबाल आणि महमुदुल्लाहच्या गैरहजेरीमध्ये विजयाची अपेक्षा नव्हती. परंतु बांदलादेशने पहिल्यांदा न्यूझीलंडला अधिक धावा करण्यापासून रोखले. बांगलादेशच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडला पहिल्या डावात 328 धावांत गुंडाळले. यानंतर कर्णधार मोमिनुल हक (88), लिटन दास (86), महमुदुल हसन जॉय (78) आणि नजमुल हुसैन शंटो (64) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर बांगलादेशने 458 धावा केल्या आणि 130 धावांची मोठी आघाडी घेतली. .

- Advertisement -

हेही वाचा : Ind vs SA 2nd Test : लॉर्ड शार्दुलचा ‘ठाकुरी’ बाणा, दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ केला गारद

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -