घरक्रीडापुन्हा एकदा आयसीसीची मोठी चूक, टीम इंडियाने गमावलं नंबर १ चं स्थान

पुन्हा एकदा आयसीसीची मोठी चूक, टीम इंडियाने गमावलं नंबर १ चं स्थान

Subscribe

भारतीय संघाने नागपूर कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी आहे. या विजयानंतर दुपारी टीम इंडिया कसोटीमध्ये नंबर – १ चा संघ ठरला होता. टीम इंडियाला ११५ रेटिंग्स गुण मिळाले होते. मात्र, आयसीसीने पुन्हा एकदा मोठी चूक केली असून टीम इंडियाने नंबर-१ चं स्थान गमावलं आहे. आयसीसीच्या तांत्रिक चुकीमुळे हे घडल्याचे बोलले जात आहे.

आयसीसीने आज क्रमवारी जाहीर केली होती. ऑस्ट्रेलियाचा संघ १११ रेटिंगसह पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावरून आला होता. मात्र, सायंकाळी उशिरा त्यांनी त्यात पुन्हा बदल केला. ऑस्ट्रेलियाचा संघ १२६ गुणांसह पहिल्या तर टीम इंडिया ११५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

- Advertisement -

आयसीसीच्या रँकिंगमध्ये चूक होण्याची ही पहिलीच घटना नाही. मागच्या महिन्यातच आयसीसीने नेमकी हीच चूक करून टीम इंडियाला कसोटी क्रिकेटमधील नंबर वन संघ बनवले होते. त्यावेळेही आयसीसीने २ तासांत बदल करून परिस्थिती आटोक्यात आणली होती. मात्र, आता पुन्हा एकदा आयसीसीने चुकीचं रँकिंग दाखवत तीच घोडचूक केली आहे.

- Advertisement -

आयसीसी क्रमवारीत पाकिस्तान ८८ गुणांसह सहाव्या, श्रीलंका ८८ गुणांसह सातव्या, वेस्ट इंडिज ७८ गुणांसह आठव्या, बांगलादेश ४६ गुणांसह नवव्या आणि झिम्बाब्वे २७ गुणांसह १० व्या स्थानावर आहे.


हेही वाचा : ICC Ranking: भारतीय संघाची मोठी झेप, कसोटी क्रमवारीत बनला नंबर 1 संघ; तिन्ही फॉरमॅटमध्ये डंका


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -