घरठाणेगायमुख चौपाटीच्या दुसर्‍या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार

गायमुख चौपाटीच्या दुसर्‍या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार

Subscribe

ठाण्यातील गायमुख चौपाटीच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी उद्घाटन केले होते. त्या चौपाटीच्या दुसर्‍या टप्प्याचे काम ही पूर्ण झाले आहे. त्या कामाच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्न उपस्थित झाल्यावर हा मुद्दा चर्चेला आला. त्यावेळी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी येत्या मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महापालिका अधिकार्‍याना दिले आहेत. मे महिन्यात या चौपाटीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. त्यादृष्टीने दुसर्‍या टप्प्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत. ठाणेकरांना नवे पर्यटन केंद्र, मनोरंजन आणि विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध व्हावे या उद्देशातून ठाणे महापालिका आणि महाराष्ट्र मरिटाईम बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने घोडबंदरच्या गायमुख खाडी किनारी भागात चौपाटी उभारण्यात आली आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव या चौपाटील देण्यात आले आहे.

ऑगस्ट 2019 मध्ये या चौपाटीचे उद्घाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. ठाणे महापालिकेने या प्रकल्पासाठी तसेच त्याच्या जोड कामांसाठी सुमारे 40 कोटींचा निधी खर्च केला आहे. या चौपाटीच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून दुसर्‍या टप्प्याचे काम ठाणे महालिकेच्या वतीने सुरू आहे. मंगळवारी आमदार प्रताप सरनाईक यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या दालनात बोलविलेल्या बैठकीत हा मुद्दा चर्चेला आला. त्यावेळी चौपाटीच्या कामाला गती देण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत. तसेच ज्या जागेवर गायमुख चौपाटी उभारण्यात आली आहे ती जागा मेरिटाइम बोर्डाची असून ठाणे महापालिकेच्या वतीने चौपाटी विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे या चौपाटीचे काम पूर्ण झाल्यानंतर देखभाल दुरुस्ती ही मेरिटाईम बोर्डकडेक देण्यात यावी असा निर्णय ही या बैठकीत घेण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -