घरक्रीडाक्रिकेट विश्वचषकासाठी केवळ एक भारतीय पंच

क्रिकेट विश्वचषकासाठी केवळ एक भारतीय पंच

Subscribe

इंग्लंडमध्ये ३० मेपासून सुरु होणार्‍या क्रिकेट विश्वचषकाच्या साखळी सामन्यांसाठी एस. रवी याकेवळ एका भारतीय पंचाची निवड झाली आहे. आयसीसीने शुक्रवारी साखळी सामन्यांसाठीपंच आणि मॅच रेफ्री यांचीयादी जाहीर केली. यामध्ये १६ पंच आणि६ मॅच रेफ्रीचा समावेश आहे. या विश्वचषकातएकूण ४८ सामने होणार आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक चांगले पंच म्हणून ओळखले जाणारे भारताचेएस. रवी हे काही दिवसांपूर्वीच चर्चेचा विषय ठरले होते. सध्या सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये(आयपीएल) मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यात बंगळुरूला अखेरच्या चेंडूवर ७ धावांची गरज होती. स्ट्राईकवर असलेल्या शिवम दुबेला षटकार लगावता आला नव्हताआणि बंगळुरूचा पराभव झाला.

- Advertisement -

मात्र, सामना संपल्यावर लसिथ मलिंगा टाकत असलेल्या षटकातील शेवटचा चेंडू नो-बॉल असल्याचे दिसले. सामन्यादरम्यान ही गोष्ट रवी यांना लक्षात आली नाही. त्यामुळे सामना संपल्यावर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने त्यांच्यावर बरीच टीका केली होती. मात्र, असे असलेत्यांचीविश्वचषकासाठी निवड झाली आहे. रवी यांनी आतापर्यंत ३३ कसोटी, ४२ एकदिवसीय आणि १८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत पंचाची भूमिका पार पाडली आहे.

या विश्वचषकाचा पहिला सामना यजमान इंग्लंड आणि द.आफ्रिका यांच्यात होणार असूनयामध्ये डेविड बून (ऑस्ट्रेलिया) हे मॅच रेफ्री तर कुमार धर्मसेना (श्रीलंका) हे पंच आणि पॉल रायफल (ऑस्ट्रेलिया) हे तिसरे पंच म्हणून काम करणार आहेत. या तिघांनीही याआधी खेळाडू म्हणून विश्वचषक जिंकला आहे.

- Advertisement -

या पंच आणि मॅच रेफ्रीची निवड हीफक्त साखळी सामन्यांसाठी झाली असून उपांत्य फेरीसाठी पंच आणि मॅच रेफ्री हे साखळी सामन्यानंतर निवडले जातील. तर अंतिम सामन्यासाठी पंच आणि मॅच रेफ्रीची निवड उपांत्य फेरीच्या सामन्यांनंतर होईल.

मॅच रेफ्री :डेविड बून, क्रिस ब्रॉड, जेफ क्रो, अँडी पायक्रॉफ्ट, रंजन मधुगले, रिची रिचर्डसन

पंच :एस. रवी, कुमार धर्मसेना, पॉल रायफल, अलीम दार, मरेएसइरॅस्मस, क्रिस गॅफनी, इयन गुल्ड, रिचर्ड ईलिंगवर्थ, रिचर्ड कॅटलब्रॉ, नायजेल लाँग, रुचिरा पल्लियागुरुगे, रॉड टकर, मायकल गॉफ, पॉल विल्सन, जोएल विल्सन,ब्रूस ऑक्सनफोर्ड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -