घरक्रीडाश्रेयस अय्यरने फिफ्टी, फिफ्टी आणि फिफ्टी ठोकल्या, एकट्याने 200 हून अधिक धावा...

श्रेयस अय्यरने फिफ्टी, फिफ्टी आणि फिफ्टी ठोकल्या, एकट्याने 200 हून अधिक धावा केल्या

Subscribe

श्रेयस अय्यरने या मालिकेत 117 चेंडूंचा सामना करत 204 धावा केल्या. स्ट्राइक रेट 174 च्या आसपास होता, जो खूप चांगला आहे. त्याने 20 चौकार आणि 7 षटकार मारले. म्हणजेच चौकार मारून 122 धावा केल्या. पहिल्या T20 मध्ये त्याने 28 चेंडूंत नाबाद 57 धावा केल्यात.

धर्मशाळा : श्रेयस अय्यर सध्या त्याच्या कारकिर्दीच्या सर्वोत्तम टप्प्यावर आहे. तिसऱ्या T-20 (India vs Sri Lanka) मध्ये त्याने 45 चेंडूंत नाबाद 73 धावा केल्यात. तसेच 9 चौकार आणि एक षटकार लगावलाय. त्याच्या या शानदार खेळीच्या जोरावर भारताने हा सामना 6 गडी राखून जिंकला आणि मालिकेत 3-0 अशी आघाडीही घेतली. श्रीलंकेने प्रथम खेळताना 5 विकेट गमावत 146 धावा केल्या होत्या. पण भारताने 16.5 षटकांत 4 विकेट्स मिळवल्या. अय्यर संपूर्ण मालिकेत नाबाद राहिला आणि त्याने सर्व 3 सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली. T-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचा हा सलग 12 वा विजय आहे. आता भारत आणि श्रीलंका यांच्यातील 2 सामन्यांची कसोटी मालिका 4 मार्चपासून सुरू होणार आहे.

श्रेयस अय्यरने या मालिकेत 117 चेंडूंचा सामना करत 204 धावा केल्या. स्ट्राइक रेट 174 च्या आसपास होता, जो खूप चांगला आहे. त्याने 20 चौकार आणि 7 षटकार मारले. म्हणजेच चौकार मारून 122 धावा केल्या. पहिल्या T20 मध्ये त्याने 28 चेंडूंत नाबाद 57 धावा केल्यात. त्यानंतर दुसऱ्या टी-20मध्ये 44 चेंडूंत 74 धावा केल्या आणि नाबाद राहिला. या मालिकेत विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्यामुळे त्याचे तीन डावही महत्त्वाचे होते. अशा स्थितीत अय्यरला क्रमांक-3 वर खेळण्याची संधी मिळाली. अय्यरला प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला.

- Advertisement -

प्रथमच फलंदाजाने 200 पेक्षा जास्त धावा केल्या

श्रेयस अय्यरने 3 सामन्यांच्या T20 I मालिकेत 204 धावा केल्यात. तीन सामन्यांच्या मालिकेत पहिल्यांदाच भारतीय फलंदाजाने 200 धावांचा टप्पा गाठला. यापूर्वी विराट कोहलीने 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत 199 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने 3 अर्धशतकेही झळकावली आणि त्याचा स्ट्राईक रेट 160 होता. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी श्रेयस अय्यरलाही संघात स्थान मिळाले. ही कामगिरी त्यांना कसोटी मालिकेतही कायम ठेवायची आहे.

32 डावांत 6 अर्धशतके

श्रेयस अय्यरच्या T-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील कामगिरीवर नजर टाकली तर त्याने 32 डावांमध्ये 37 च्या सरासरीने 809 धावा केल्यात आणि 6 अर्धशतके लगावलीत. त्याने नाबाद 74 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. याच मालिकेत त्याने ही धावसंख्या उभी केली. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 141 आहे. एकूण T-20 मध्ये त्याने 2 शतके आणि 28 अर्धशतके केली आहेत. त्याने 2 कसोटी सामन्यात 51 च्या सरासरीने 202 धावा केल्यात, तर 26 एकदिवसीय सामन्यांमध्ये 41 च्या सरासरीने 927 धावा केल्यात.

- Advertisement -

हेही वाचाः Vinod Kambli Arrested : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला अटक अन् जामीन, नेमकं प्रकरण काय?

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -