घरक्रीडाऑस्ट्रेलियाविरुद्ध डे-नाईट कसोटी खेळणे आव्हानात्मक!

ऑस्ट्रेलियाविरुद्ध डे-नाईट कसोटी खेळणे आव्हानात्मक!

Subscribe

११ डिसेंबरपासून अ‍ॅडलेड येथे होणारा या मालिकेतील दुसरा कसोटी सामना प्रकाशझोतात होईल.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध डे-नाईट (प्रकाशझोतात) कसोटी सामना खेळणे आव्हानात्मक असेल, असे मत भारताचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारने व्यक्त केले. भारतीय संघ यावर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून दोन संघांमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. ११ डिसेंबरपासून अ‍ॅडलेड येथे होणारा या मालिकेतील दुसरा कसोटी सामना प्रकाशझोतात होईल. ऑस्ट्रेलियाला आतापर्यंत सर्वाधिक डे-नाईट कसोटी सामन्यांचा (सात) अनुभव असून भारताने केवळ एक डे-नाईट कसोटी खेळली आहे. त्यामुळे या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे पारडे जड मानले जात आहे.

ऑस्ट्रेलियाला बऱ्याच डे-नाईट कसोटींचा अनुभव     

बराच काळ क्रिकेट होत नसल्याने सर्व जण भारत आणि ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेसाठी खूप उत्सुक आहे. त्यांना खूप दिवसांनी पुन्हा क्रिकेट पाहण्याची संधी मिळेल. ऑस्ट्रेलिया हा जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. त्यांना पराभूत करणे नेहमीच आव्हान असते. आम्ही डे-नाईट कसोटी सामनाही खेळणार आहोत. ऑस्ट्रेलियाने त्यांच्या घरच्या मैदानावर बरेच डे-नाईट कसोटी सामने खेळले आहेत. त्यामुळे आमच्यासाठी हा सामना खेळणे आव्हानात्मक असेल. मात्र, अॅडलेडमध्ये गुलाबी चेंडूने खेळताना मजाही येईल, असे भुवनेश्वर म्हणाला. भारताने मागील वर्षी पहिल्यांदा बांगलादेशविरुद्ध कोलकाता येथे डे-नाईट कसोटी सामना खेळला होता आणि जिंकला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -