घरक्रीडाप्रभातचे लक्ष्य ‘कॅलिफोर्निया ट्रिपल क्राऊन’चे

प्रभातचे लक्ष्य ‘कॅलिफोर्निया ट्रिपल क्राऊन’चे

Subscribe

सहा समुद्र पोहून पार करणार्‍या चेंबूरच्या १९ वर्षीय प्रभात कोळीला आता कॅलिफोर्निया ट्रिपल क्रॉऊन खुणावत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिकणारा प्रभात यासाठी लवकरच अमेरिकेसाठी रवाना होईल. वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशनच्या मान्यतेनुसार कॅलिफोर्नियातील अ‍ॅनाकॅपा ते मेनलँड (सांता बारबरा), लेक तहाऊ आणि कॅटरिना चॅनेल हे कॅलिफोर्निया ट्रिपल क्राऊन म्हणून ओळखले जातात.

यातील कॅटरीना चॅनेल प्रभातने २०१६ साली पोहून पार केले होते. आता कॅलिफोर्निया ट्रिपल क्राऊन पूर्ण करण्यासाठी प्रभात प्रशांत महासागरात पोहणार आहे. प्रभात ३ जुलै रोजी अ‍ॅनाकॅपा ते मेनलँड हे २० किलोमीटरचे अंतर पोहून जाणार आहे. १९७८ पासून केवळ ७८ जलतरणपटू हे अंतर पोहून पार करण्यात यशस्वी ठरले आहेत.

- Advertisement -

त्यानंतर प्रभात १७ जुलै रोजी ३० किलोमीटर अंतर असणारा लेक तहाऊ पोहणार आहे. कॅलिफोर्नियात २००० मीटर उंचीवर असलेल्या लेक तहाऊमधील पाण्याचे तापमान १२ ते १५ अंश सेल्सिअस इतके थंड असते. याशिवाय याठिकाणी ऑक्सिजनची मात्राही कमी असते. लेक तहाऊ आतापर्यंत ५८ जलतरणपटूंनी पार केला आहे.

प्रभातची ही मोहीम यशस्वी झाल्यास कॅलिफोर्निया ट्रिपल क्राऊन मिळवणारा तो पहिला भारतीय जलतरणपटू ठरणार आहे. आतापर्यंत अमेरिका, कॅनडा, इंग्लंड आणि मेक्सिको या देशातील अवघ्या १३ जलतरणपटूंनी कॅलिफोर्निया ट्रिपल क्राऊन मिळवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -