घरक्रीडाViral Video : प्रसिद्ध कृष्णाची आणि एरॉन फिंचमध्ये खडाजंगी, स्लेजिंगने वादाला फुटले...

Viral Video : प्रसिद्ध कृष्णाची आणि एरॉन फिंचमध्ये खडाजंगी, स्लेजिंगने वादाला फुटले तोंड

Subscribe

राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने केकेआर विरोधात ७ धावांनी विजय मिळवला. पण सामना गाजला तो म्हणजे एरॉन फिंच आणि राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यांच्यातील वादाने. या वादाचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. फिंच आणि कृष्णा यांच्यातील वादाने सगळ्यांच्या नजरा या घटनेकडे लागल्या.

राजस्थान रॉयल्सच्या २१८ धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सने अतिशय जबरदस्त अशी इनिंगची सुरूवात केली. एरॉन फिंच आणि श्रेयस अय्यरच्या विस्फोटक फलंदाजीमुळे ८.३ ओव्हरमध्ये १०७ धावा करण्यात केकेआरला यश आले. त्यानंतर नवव्या ओव्हर एरॉन फिंचला वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने बाद करत राजस्थान रॉयल्सला सामन्यात पुन्हा आणण्याची कामगिरी केली. नवव्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर प्रसिद्ध कृष्णाने करूण नायरच्या हस्ते फिंचला कॅच आऊट केले. जेव्हा एरॉन फिंच पव्हेलियनला जात होता तेव्हा प्रसिद्ध कृष्णाने स्लेजिंगला सुरूवात केली. या स्लेजिंगला एरॉन फिंचनेही लगेचच प्रत्युत्तर दिले. दोघांमध्ये झालेल्या वादाचा व्हिडिओ हा सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

- Advertisement -

एरॉन फिंचने या सामन्यात २८ चेंडूत ५८ धावा केल्या. त्यामध्ये ९ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. फिंच आणखी काही वेळ जर क्रीजवर राहिला असता तर सामना राजस्थान रॉयल्सपासून दूर नेण्यात त्याला यश मिळाले असते. राजस्थान रॉयल्सने २० षटकात २१७ धावा केल्या होत्या. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सची टीम चहलच्या फिरकीच्या जादूसमोर १९.४ ओव्हरमध्ये २१० धावांमध्ये ऑल आऊट झाली.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -