घरक्रीडाPremier League Football : एव्हर्टन-टॉटनहॅम सामन्यात बरोबरी

Premier League Football : एव्हर्टन-टॉटनहॅम सामन्यात बरोबरी

Subscribe

दोन्ही संघांना एक-एक गुण मिळाला.

एव्हर्टन आणि टॉटनहॅम यांच्यातील इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेचा सामना २-२ असा बरोबरीत संपला. त्यामुळे दोन्ही संघांना एक-एक गुण मिळाला. टॉटनहॅमचा संघ आता ५० गुणांसह प्रीमियर लीगच्या गुणतक्त्यात सातव्या स्थानावर असून एव्हर्टन ४९ गुणांसह आठव्या स्थानी आहे. दरम्यान या सामन्यात टॉटनहॅमचा स्टार स्ट्रायकर हॅरी केनच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे टॉटनहॅमचा संघ चिंतेत आहे. दुसरीकडे न्यूकॅसलने वेस्ट हॅमवर ३-२ असा विजय मिळवला. न्यूकॅसलकडून या सामन्यात इसा डियोप (स्वयं गोल), जोएलइंटसन आणि जो विलक यांनी गोल केले.

त्याआधी एव्हर्टन आणि टॉटनहॅम यांच्यातील सामना चुरशीचा झाला. या सामन्यात एव्हर्टनने अधिक आक्रमक खेळ केला. मात्र, २७ व्या मिनिटाला टॉटनहॅमला गोलची संधी मिळाली आणि हॅरी केनने या संधीचे फायदा घेत गोल करून टॉटनहॅमला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, ही आघाडी केवळ चार मिनिटे टिकली. ३१ व्या मिनिटाला एव्हर्टनला पेनल्टी मिळाली आणि याचे गिल्फी सिगुरसनने गोलमध्ये रूपांतर करून एव्हर्टनला सामन्यात १-१ अशी बरोबरी करून दिली. उत्तरार्धात पुन्हा एव्हर्टनकडून सिगुरसनने, तर टॉटनहॅमकडून केनने गोल केला. त्यामुळे हा सामना २-२ असा बरोबरीत संपला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -