घरक्रीडाप्रसिद्ध टेनिसपटू राफेल नदालची निवृत्ती; 2024 हे शेवटचे वर्ष, तर फ्रेंच ओपनमधूनही...

प्रसिद्ध टेनिसपटू राफेल नदालची निवृत्ती; 2024 हे शेवटचे वर्ष, तर फ्रेंच ओपनमधूनही माघार

Subscribe

यंदाच्या फ्रेंच ओपन स्पर्धेतून स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल याने माघार घेतली आहे. 2005 नंतर राफेल नदाल पहिल्यांदाच फ्रेंच ओपनमध्ये खेळणार नाही. विशेष म्हणजे राफेल नदाल याने निवृत्तीचे संकेतही दिले आहेत.

यंदाच्या फ्रेंच ओपन स्पर्धेतून स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल याने माघार घेतली आहे. राफेल नदाल याने 2005 नंतर पहिल्यांदाच फ्रेंच ओपनमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे राफेल नदाल याने निवृत्तीचे संकेतही दिले आहेत. 2024 हे वर्ष टेनिसमधील अखेरचे असेल, असे राफेल नदालने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितल्याची माहिती समोर येत आहे. (rafael nadal retirement expects 2024 last year in tennis out of french open first time absent since 2005)

राफेल नदाल याने 2005 मध्ये टेनिस विश्वात पदार्पण केले होते. तेव्हापासून ते प्रत्येक फ्रेंच ओपन स्पर्धेत सहभागी होता. पण 18 वर्षात पहिल्यांदाच त्याने फ्रेंच ओपन स्पर्धा न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. राफेल नदालने आजपर्यंत 22 ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत. सध्या नदाल एटीपी क्रमवारीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. राफेल नदाल हा सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा पुरुष खेळाडू आहे. त्याने 22 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.

- Advertisement -

यंदा जानेवारी महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलिया ओपन या स्पर्धेमध्ये राफेल नदालला दुसऱ्या फेरीतच बाहेर पडावे लागले होते. दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला. तेव्हापासून आजपर्यंत तो मैदानात परतू शकलेला नाही.

दरम्यान, नोव्हाक जोकोविचने त्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. या दोन खेळाडूंमध्ये टेनिस विश्वातील सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याची शर्यत आहे. विशेष म्हणजे फ्रेंच ओपनमध्ये राफेल नदालने अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने 22 पैकी 14 ग्रँडस्लॅम जेतेपद फक्त फ्रेंच ओपनमध्ये जिंकले आहेत.

- Advertisement -

राफेल नदालने 2005, 2006, 2007, 2008, 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2017, 2018, 2019, 2020, 2022 मध्ये असं 14 वेळा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे. तर, 2009 आणि 2022 ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली.

याशिवाय, राफेल नदालने 2008 आणि 2010 मध्ये वम्बिलडन आणि 2010, 2013, 2017, 2019 मध्ये यूएस ओपनचा खिताब जिंकला आहे.


हेही वाचा – जाहिरातींचे नियम मोडणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये धोनी, भुवन बाम अव्वल, ASCIकडून यादी जाहीर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -