चेन्नई विरुद्ध लखनौच्या सामन्यात पावसाची बॅटींग, धोनीच्या चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर

चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात आयपीएलचा ४५वा सामना खेळण्यात आला. यावेळी या सामन्यात पावसाने एन्ट्री केल्यामुळे हा सामना रद्द करावा लागला. चेन्नईच्या फिरकीपटूंनी खेळपट्टीचा पुरेपूर उपयोग करत लखनौचा निम्मा संघ ४४ धावांत माघारी पाठवला होता. निकोलस पूरन आणि आयुष बदोनी यांची अर्धशतकी भागीदारी सामन्याला कलाटणी देणारी ठरली.

आयुषने वैयक्तिक अर्धशतक झळकावले आणि संघाला १९.२ षट्कांत ७ बाद १२५ धावांपर्यंत पोहोचवले. परंतु पावसाच्या हजेरीमुळे सामना बराच वेळ थांबवावा लागला आणि ७ वाजता सुरू असलेला सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर दोन्ही संघांना १-१ असे गुण देण्यात आले. मात्र, या सामन्यावर महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कायले मायर्स (१४), मनन वोहरा (१०), कृणाल पांड्या (०), मार्कस स्टॉयनिस (६) आणि करण शर्मा (९) एकेरी धावेत माघारी परतले. तर आयुष बदोनी आणि निकोलस पूरन यांनी CSKच्या गोलंदाजांचा सामना करताना ५९ धावांची भागीदारी केली.

रविंद्र जाडेजाने मार्कस स्टॉयनिसला बाद केल्यानंतर लखनौच्या अडचणी आणखी वाढवल्या. मार्कस स्टॉयनिस ६ धावांवर माघारी परतला. आयुष बडोनीने अखेरपर्यंत किल्ला लढवला. आयुष बडोनी याने ३३ चेंडूत नाबाद ५९ धावांची खेळी केली. बडोनीने आपल्या या खेळीत ४ षट्कार आणि २ चौकार लगावले आहेत. पाऊस येण्यापूर्वी आयुष बडोनीने दमदार फलंदाजी करत लखनौचा डाव सावरला होता.


हेही वाचा : पवारांची राजकारणातून तर धोनीची IPL मधून निवृत्ती? माहीने स्पष्टचं सांगितलं…