घरक्रीडा'८३' च्या तयारीसाठी रणवीर सिंह पोहचला लॉर्ड्सवर

‘८३’ च्या तयारीसाठी रणवीर सिंह पोहचला लॉर्ड्सवर

Subscribe

रणवीर १९८३ त्या वर्ल्डकपवर आधारित येणारा चित्रपट '८३' या चित्रपटात काम करणार आहे. त्याचीच तयारी करण्यासाठी सध्या रणवीर सध्या लॉर्ड्सवर पोहचला आहे.

भारत आणि इंग्लंड दरम्यान दुसरी टेस्ट मॅच ९ ऑगस्टपासून क्रिकेटचा मक्का अर्थात लॉर्ड्सवर सुरु झाली. मात्र पहिल्या दिवशी पावसामुळं खेळात खंड पडला. पुढचे चार दिवसही वातारवण असंच राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर ही मॅच बघण्यासाठी बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि दिग्दर्शक कबीर खान पोहचले होते. रणवीर १९८३ त्या वर्ल्डकपवर आधारित येणारा चित्रपट ‘८३’ या चित्रपटात काम करणार आहे. त्याचीच तयारी करण्यासाठी सध्या रणवीर सध्या लॉर्ड्सवर पोहचल्याची बातमी आहे. दरम्यान रणवीरनं आपल्या इन्स्टावर फोटो पोस्ट करत ‘रेन रेन गो अवे’ म्हणत मॅच सुरु होण्याचा धावा केला होता.

क्रिकेटच्या देवाबरोबरही भेट

रणवीर सिंह आणि कबीर खान यांनी यावेळी क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरचीदेखील भेट घेतली आणि त्याच्याबरोबर एक फोटो काढला. पावसामुळं नाराज झालेला रणवीर सचिनला भेटल्यामुळं अगदी आनंदात असलेला या फोटोमध्ये दिसत आहे. कबीर खाननं सचिन आणि रणवीर सिंहबरोबरचा आपला हा फोटो पोस्ट केला आहे. ‘१९८३ मध्ये कपिल देव यांना वर्ल्ड कप घेताना याच मैदानावर ९ वर्षीय सचिन तेंडुलकरनं पाहिलं होतं. याच मॅचमुळे क्रिकेट खेळण्याची प्रेरणा सचिन तेंडुलकरना मिळाली. ३५ वर्षानंतर आता ‘८३’ या चित्रपटाची तयारी आम्ही लॉर्ड्सवर सुरु केली आहे. यापेक्षा अजून चांगलं काय असू शकतं?’ अशी कॅप्शन देत कबीरनं आपली भावना व्यक्त केली. तर हाच फोटो सचिननंदेखील आपल्या अकाऊंटवरून पोस्ट करत दोन चांगल्या व्यक्तींना आज भेटलो. कबीर खान आणि रणवीर सिंहला नेहमीच भेटायला आवडतं अशी भावना सचिननं व्यक्त केली.

- Advertisement -
ranveer with sachin tendulkar and kabir khan
सचिन तेंडुलकरबरोबर कबीर खान आणि रणवीर सिंह (सौजन्य – इन्स्टाग्राम)

१९८३ च्या वर्ल्डकपवर चित्रपट

कबीर खान १९८३ च्या वर्ल्डकपवर चित्रपट बनवत असून यामध्ये कपिल देवची भूमिका रणवीर सिंह साकारत आहे. ‘८३’ या चित्रपटाची तयारी सध्या जोरदार चालू असून हा चित्रपट १० एप्रिल, २०२० मध्ये प्रदर्शित होईल. रणवीरनं याविषयी याआधी या चित्रपटात काम करणं हा आपला सम्मान असल्याचं सांगितलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -