घरक्रीडाIND vs ENG : अश्विनचा इंग्लंडला दणका; जो रूटला पाठवले स्वस्तात माघारी 

IND vs ENG : अश्विनचा इंग्लंडला दणका; जो रूटला पाठवले स्वस्तात माघारी 

Subscribe

तिसऱ्या कसोटीतही रूट फिरकीच्या जाळ्यात अडकला.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला बुधवारपासून सुरुवात झाली. हा सामना अहमदाबादमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या स्टेडियममध्ये होत आहे. सामन्याच्या दिवशी या स्टेडियमचे नामकरण झाले. या स्टेडियमला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले. तसेच भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या स्टेडियमचे उद्घाटन केले. या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडचा कर्णधार जो रूटच्या बाजूने लागला. रूटने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्या डावाची चांगली सुरुवात होऊ शकली नाही. खासकरून भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने इंग्लंडला सर्वात मोठा झटका दिला. त्याने रूटला स्वस्तात माघारी पाठवले. रूट ३७ चेंडूत केवळ १७ धावा करू शकला. त्याला अश्विनने पायचीत पकडले.

रूट फिरकीच्या जाळ्यात अडकला

रूट सध्या चांगल्या फॉर्मात असून त्याने भारताविरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात २१८ धावांची खेळी केली होती. मात्र, मागील सामन्यात त्याला फारशा धावा करता आल्या नाहीत. त्याने पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात ३३ धावांची खेळी केली होती. या दोन्ही डावांमध्ये त्याला डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने बाद केले होते. आता तिसऱ्या कसोटीतही तो फिरकीच्या जाळ्यात अडकला. त्याला अश्विनने १७ धावांवर पायचीत पकडत इंग्लंडला तिसरा झटका दिला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -