घरक्रीडाRohit Sharma IPL 2022 : मी संपूर्ण जबाबदारी घेतो, मुंबईच्या सलग ६...

Rohit Sharma IPL 2022 : मी संपूर्ण जबाबदारी घेतो, मुंबईच्या सलग ६ व्या पराभवानंतर रोहित शर्माची प्रतिक्रिया

Subscribe

आयपीएलच्या आतापर्यंतच्या हंगामातील सर्वात यशस्वी ठरलेला संघ मुंबई इंडियन्स आयपीएलच्या १५ व्या हंगामात ६ वेळा पराभूत झाला आहे. शनिवारी झालेल्या लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा पराभव झाला आहे. आयपीएल २०२२ मध्ये मुंबईने आतापर्यंत एकही सामना जिंकला नाही. सामना संपल्यावर पराभवाची जबाबदारी संघाचा कर्णधार रोहित शर्माने घेतली आहे.

आयपीएलच्या हंगामातीलह सहावा सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे. पराभव झाल्यामुळे रोहित शर्मा निराश झाला आणि त्याने पराभवाची जबाबदारी घेतली आहे. काय चूक होत आहे हे जर मला कळाले असते तर ती दुरुस्त केली असते. परंतु सध्या तसे होत नाही आहे. माझ्या अनुभवाचा पुरेपूर वापर करेन आणि आम्ही पुन्हा संघ म्हणून पुनरागमन करु असे रोहित शर्मा म्हणाला आहे. रोहित शर्मा एक कर्णधार म्हणून विजय मिळवू शकला नाहीच तसेच त्याला फलंदाजीमध्ये अपयश मिळत आहे.

- Advertisement -

दरम्यान रोहित शर्मा पुढे म्हणाला की, सामन्यामध्ये भागिदारी न करणं आम्हाला हानिकारक ठरलं आहे. संघाने चांगली गोलंदाजी केली परंतु के एल राहुलच्या फलंदाजीसमोर अपयशी ठरली आहे. एका खेळाडूच्या जोरावर सामना जिंकू शकत नाही. इतर खेळाडूंना आपली कामगिरी सुधारावी लागणार आहे. रोहित शर्माने विरोधी संघाचने कौतुकसुद्धा केले आहे. केएल राहुलची खेळी शानदार होती.

मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सच्या पहिल्या फलंदाजीमध्ये १९१ धावा केल्या आहेत. कर्णधार के एल राहुलने शानदार शतक ठोकले होते. मुंबईला १९१ धावांचे आव्हान देण्यात आले होते. परंतु त्यांना ते आव्हान पूर्ण करता आले नाही. मुंबईला फक्त १८१ धावा काढण्यात यश मिळाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : IPL 2022: गुजरात टायटन्सवर विजय मिळवण्यासाठी धोनी झाला फिरकीपटू, नेट प्रॅक्टिस करतानाचा Video व्हायरल

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -