घरक्रीडाचेन्नई सुपर किंग्जसाठी धोनीनंतर 'हा' खेळाडू होऊ शकतो कर्णधार, दिग्गजांकडून मोठी मागणी

चेन्नई सुपर किंग्जसाठी धोनीनंतर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो कर्णधार, दिग्गजांकडून मोठी मागणी

Subscribe

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आगामी काळात येणाऱ्या आयपीएल २०२३ च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसणार आहे. परंतु पुढील वर्षाचा हंगाम त्याच्यासाठी शेवटचा हंगाम ठरू शकतो असं म्हटलं जातंय. ४१ वर्षीय महेंद्रसिंग धोनीला आयपीएल २०२३ नंतर कर्णधार आणि खेळाडू म्हणून पुढे खेळणे शक्य होणार नाहीये. त्यामुळे धोनीनंतर २५ वर्षीय खेळाडू सीएसकेचा पुढचा कर्णधार होण्याचा प्रबळ दावेदार आहे. तसेच त्याच्यासाठी दिग्गजांकडून देखील मोठी मागणी केली जात आहे.

धोनीनंतर CSKचा पुढचा कर्णधार कोण?

- Advertisement -

भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK)पुढील कर्णधाराबाबत मोठी मागणी केली आहे. वसीम जाफरच्या मते, महेंद्रसिंग धोनीनंतर ऋतुराज गायकवाडला चेन्नई सुपर किंग्जचा पुढचा कर्णधार बनवले जाऊ शकते. आयपीएल २०२२च्या हंगामात रवींद्र जाडेजाला चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधार बनवण्यात आले होते, मात्र सततच्या पराभवामुळे त्याला हंगामाच्या मध्यातच कर्णधारपद सोडावे लागले आणि पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीच्या हाती कर्णधारपद आले.

दिग्गजांनी आतापासून मोठी मागणी

- Advertisement -

भारताचा माजी फलंदाज वसीम जाफरने ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदासाठी ऋतुराज गायकवाड हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. ऋतुराज गायकवाड हा युवा खेळाडू असून त्याला महाराष्ट्राच्या कर्णधारपदाचा अनुभवही आहे.

पुढे वसीम जाफर म्हणाला की, चेन्नई सुपर किंग्जमध्ये महेंद्रसिंग धोनीनंतर पुढचा कर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाडची निवड होऊ शकते. चेन्नई सुपर किंग्जचा संघ यष्टीरक्षक म्हणून डेव्हॉन कॉनवेवर विश्वास ठेवू शकतो. कारण डेव्हॉन कॉनवे चेन्नई सुपर किंग्जसाठी दीर्घकाळ यष्टीरक्षकाची भूमिका बजावू शकतो.

IPL २०२३साठी या खेळाडूंना केलं रिटेन

एमएस धोनी, रवींद्र जडेजा, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, अंबाती रायुडू, ड्वेन प्रिटोरियस, महिश तिक्ष्णा, प्रशांत सोळंकी, दीपक चहर, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंग, तुषार देशपांडे, राजवर्धन हंगर, मिशेल संकर, मिशेल संकर, सुभ्रांशु सेनापती.


हेही वाचा : आयसीसीच्या टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत सूर्यकुमार यादव अव्वल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -