घरक्रीडातू घाबरू नकोस, ट्रोलर्सला मैदानातील खेळातून उत्तर दे; सचिन तेंडुलकरचा अर्शदीप सिंहला...

तू घाबरू नकोस, ट्रोलर्सला मैदानातील खेळातून उत्तर दे; सचिन तेंडुलकरचा अर्शदीप सिंहला सल्ला

Subscribe

आशिया चषकातील सुपर 4 लढतीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात पाकिस्तानने 5 विकेट्स ठेवून भारताचा पराभव केला. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहकडून मोक्याच्या क्षणी झेल सुटला. त्यामुळे सोशल मीडियावर अर्शदीप सिंहला ट्रोल करण्यात आले.

आशिया चषकातील सुपर 4 लढतीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात पाकिस्तानने 5 विकेट्स ठेवून भारताचा पराभव केला. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहकडून मोक्याच्या क्षणी झेल सुटला. त्यामुळे सोशल मीडियावर अर्शदीप सिंहला ट्रोल करण्यात आले. त्यानंतर भारताचा माजी कर्णधार विरोट कोहली याने अर्शदीप सिंहच्या चुकीला समजून घेत त्याला सुधारणा करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानीही अर्शदीप सिंहला मोलाचा सल्ला दिला आहे. “ट्रोलर्सला मैदानातील खेळातून उत्तर दे.. आम्ही तुझ्या पाठिशी आहोत”, असे सचिन तेंडुलकर याने म्हटले. (sachin tendulkar talk on arshdeep singh india vs pakistan in asia cup 2022)

“प्रत्येक खेळाडू आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करताना आपले सर्वस्व पणाला लावतो, त्याशिवाय आपले सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांना आपल्या पाठिंब्याची नेहमीच गरज असते. खेळात तुम्ही कधी जिंकता तर कधी पराभव होतो. क्रिकेट असो अथवा इतर खेळ. कोणत्याही खेळाडूवर वैयक्तिक टीका करणे चुकीचे आहे. अर्शदीप तू घाबरु नकोस… प्रयत्न करत राहा. ट्रोलर्सला मैदानातील खेळातून उत्तर दे.. आम्ही तुझ्या पाठिशी आहोत… पुढील सामन्यासाठी तुला शुभेच्छा!”, असे सचिन तेंडुलकर याने म्हटले.

- Advertisement -

“चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जेव्हा मी पाकिस्तानविरुद्ध माझा पहिला सामना खेळत होतो. तेव्हा मी सुद्धा खराब शॉट खेळून आऊट झालो होतो. दबावाखाली कोणीही चूक करू शकतो. संघातील वातावरण सध्या चांगलेच आहे. अर्शदीपला त्याची चूक समजून घ्यावी लागेल जेणेकरुन तो पुढच्या वेळी दबावाच्या परिस्थितीत चांगली कामगिरी करू शकेल”, अशा शब्दांत विरोट कोहली याने अर्शदीप सिंहला पाठींबा दिला होता.

भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यात मोक्याच्या क्षणी अर्शदीप सिंहकडून आसिफ अलीचा अगदी सोपा झेल सुटला होता. त्यामुळे अर्शदीपल सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले. पाकिस्तानमधूनही अर्शदीपवर टीकास्त्र सोडण्यात आले. अर्शदीपवर अनेकांनी वयक्तिक टीका केली.

- Advertisement -

हेही वाचा – धक्कादायक! क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून सुरेश रैनाची निवृत्ती

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -