घरपालघरकाँग्रेसच्या भारत जोडो यात्रेसाठी महाराष्ट्रातून ९ नवे चेहरे

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेसाठी महाराष्ट्रातून ९ नवे चेहरे

Subscribe

ह्या पदयात्रेचे अंतर तीन हजार ५९० किलोमीटर असणार आहे. कन्याकुमारीहून सुरू होणारी भारत जोडो पदयात्रा केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाना, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर या राज्यात जाणार आहे.

डहाणू: येत्या ७ सप्टेंबरपासून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कन्याकुमारी येथून श्रीनगर अशा सुरू होणाऱ्या ‘भारत जोडो’ यात्रेसाठी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीतर्फे महाराष्ट्रातून ९ नवीन चेहऱ्यांची निवड केली असून पालघर जिल्ह्यातील युवा नेते कॅ. सत्यम ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्यासह १०० भारत यात्री १५० दिवस पदयात्रा करणार आहेत. ह्या पदयात्रेचे अंतर तीन हजार ५९० किलोमीटर असणार आहे. कन्याकुमारीहून सुरू होणारी भारत जोडो पदयात्रा केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाना, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर या राज्यात जाणार आहे. पदयात्रेत प्रत्येक राज्यातील माती आणि पाणी सोबत नेली जाणार आहे. श्रीनगर येथे पोचल्यानंतर यात्रेदरम्यान सर्व राज्यातून गोळा केलेली माती आणि पाणी एकत्र करून समता, एकता, आणि बंधुता यांचे प्रतिक म्हणून झाड लावून अखंड भारताला जोडण्याचा संदेश दिला जाणार आहे. पदयात्रेचे प्रमुख उद्दिष्ट आपल्या देशाची ढासळत चाललेली अर्थव्यवस्था, देशात वाढत चाललेली बेरोजगारी, महागाई, धार्मिक, जातीय तेढ, द्वेष भावना विसरून लोकांनी एकत्र करणे असणार आहे. महाराष्ट्रातून मनोजकुमार उपाध्याय,पिंकी राजकुमार सिंग, अतिशा पैठणकर, महिंद्रसिंग वोरा, वैष्णवी गुरुदत्त भारद्वाज, कॅप्टन सत्यम ठाकूर, रोशन बिट्टू,श्रावण रापनवाड आणि नंदा म्हात्रे अशा ९ जणांची यात्रेसाठी निवड झाली आहे.

०००

- Advertisement -

१९४२ ला भारतीयांनी ब्रिटिशांना भारत छोडोचा नारा दिला होता. आता भारतातील नागरिकांना धर्म, जाती भेद, तिरस्कार, द्वेष विसरून भारत जोडण्यासाठी भारत जोडोचा नारा दिला जाणार आहे. भारत जोडणारी एवढी मोठी पदयात्रा आजवर कोणी केली नाही.

— कॅप्टन सत्यम ठाकूर, युवा काँग्रेस अध्यक्ष, पालघर जिल्हा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -