घरक्रीडाधक्कादायक! क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून सुरेश रैनाची निवृत्ती

धक्कादायक! क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून सुरेश रैनाची निवृत्ती

Subscribe

भारतीय संघाचा शानदार फलंदाज सुरेश रैनाने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रैनाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर निवृत्तीची घोषणा केली आहे. देशाचे आणि उत्तर प्रदेश राज्याचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. मी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा करत आहे, असं ट्वीट सुरेश रैनाने केलं आहे.

- Advertisement -

आयपीएल २०२१ चा हंगाम सुरेश रैनासाठी अत्यंत निराशाजनक राहिला. तसेच २०२२ च्या हंगामात रैनाला मोठा फटका बसला होता. लिलावापूर्वी सीएसकेच्या संघाने त्याला कोणत्याच लिलावात फ्रॅंचायझीने खरेदी केले नव्हते. सुरेश रैना असा एकमेव खेळाडू आहे. ज्याने आयपीएलमध्ये पाच हजारहून अधिक धावा केल्या आहेत.

- Advertisement -

सुरेश रैनाचा वन-डे क्रिकेटमधील बेस्ट स्कोअर हा नॉट आऊट ११६ आहे. रैनाने ७८ टी-२० मॅचेसमध्ये १६०५ धावा काढल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि पाच अर्ध्या शतकांचा समावेश आहे. आयपीएलमध्ये रैनाने १९३३ मॅचेस खेळल्या आहेत. रैनाने २०५ आयपीएल सामन्यांत १३६.७३च्या स्ट्राईक रेटने एकूण ५५२८ धावा केल्या आहेत. क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा रैना पहिला भारतीय खेळाडू आहे.


हेही वाचा : भारतीय संघासमोर आज ‘करो या मरो’ स्थिती, श्रीलंकेविरुद्ध अश्विन-कार्तिकला संधी मिळण्याची


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -