घरक्रीडासिनियर महाराष्ट्र राज्य व आंतर जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा

सिनियर महाराष्ट्र राज्य व आंतर जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा

Subscribe

रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन आयोजित सिनियर महाराष्ट्र राज्य व आंतर जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या वयस्कर गटात (५० वर्षांवरील) महिलांमध्ये माधुरी तायशेटेने आणि पुरुषांमध्ये शब्बीर खान या मुंबई उपनगरच्या खेळाडूंनी अजिंक्यपद मिळवले. महिलांच्या अंतिम सामन्यात माधुरी तायशेटेने मुंबईच्या रोझिना गोदादचा १९-१७, २४-१० असा पराभव केला आणि ही स्पर्धा जिंकली. वयस्कर पुरुषांच्या अंतिम सामन्यात शब्बीर खानने मुंबईच्या मनू बारियावर २५-१३, २५-४ अशी सरळ सेटमध्ये मात करत सलग दुसर्‍यांदा या गटाचे विजेतेपद पटकावले.

तसेच पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबईच्या संदीप देवरुखकर, मोहम्मद घुफ्रान आणि प्रशांत मोरे यांना आपापले सामने जिंकण्यात यश आले. संदीप देवरुखकरने संदीप दिवेचा २५-१९, २४-११ असा, घुफ्रानने पुण्याच्या अनिल मुंढेचा २५-२२, १५-२५, २१-११ असा, प्रशांत मोरेने योगेश परदेशीचा ५-२५, २५-३, २४-३ असा पराभव केला. योगेश धोंगडेला मात्र पराभवाचा सामना करावा लागला.

- Advertisement -

महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबईच्या ऐशा खोकावालाने मुंबईच्याच संगीता चांदोरकरवर १५-१२, २१-१० अशी सरळ सेटमध्ये मात केली. काजल कुमारीने पुण्याच्या पुष्कर्णी भट्टडला २३-५, २२-८ असे पराभूत करत उपांत्य फेरी गाठली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -