घरक्रीडाशाहिनमध्ये महान गोलंदाज होण्याची क्षमता!

शाहिनमध्ये महान गोलंदाज होण्याची क्षमता!

Subscribe

पाकिस्तानच्या संघाला विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. मात्र, या संघातील बाबर आझम, शाहिन आफ्रिदी, इमाद वसीम, हॅरिस सोहेल, मोहम्मद आमिर यासारख्या खेळाडूंनी सर्वांनाच प्रभावित केले.

या सर्व खेळाडूंमध्येही पाकिस्तानचा महान गोलंदाज वसीम अक्रमने शाहिन आफ्रिदीचे विशेष कौतुक केले. शाहिनने या विश्वचषकाच्या ५ सामन्यांत तब्बल १६ विकेट्स मिळवल्या. त्याने बांगलादेशविरुद्ध अखेरच्या सामन्यात ६ गडी बाद करण्याची कामगिरी केली. त्यामुळे शाहिनमध्ये महान गोलंदाज होण्याची क्षमता आहे, असे अक्रमला वाटते.

- Advertisement -

शाहिनचे भविष्य खूप उज्ज्वल आहे. तो आगामी काळात पाकिस्तानचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज म्हणून पुढे येईल, असे मला वाटते. त्याच्यामध्ये महान गोलंदाज होण्याची क्षमता आहे. तो खूप मेहनती मुलगा आहे आणि तो खूप पटकन गोष्टी शिकतो. हे त्याचे गुण त्याच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत. शाहिन हा विकेट मिळवणारा गोलंदाज आहे आणि हे मला विश्वचषकाआधीही माहीत होते. त्यामुळेच त्याला विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांत संधी मिळाली नाही याचे मला आश्चर्य वाटले, असे अक्रम म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -