घरक्रीडाशिवम दुबेचे धडाकेबाज अर्धशतक; पोलार्डही घाबरला

शिवम दुबेचे धडाकेबाज अर्धशतक; पोलार्डही घाबरला

Subscribe

भारत विरुद्ध विंडीजचा दुसरा टी-२० सामना तिरुवनंतपुरम येथे होत आहे. विंडीजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. फलंदाजी करत असताना कर्णधार विराट कोहलीच्या एका निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला. नंबर तीनवर फलंदाजी करण्यासाठी आज शिवम दुबेला पाठविण्यात आले. शिवमनेही संघाचा निर्णय सार्थ ठरवत धडाकेबाज खेळी केली. केवळ २७ चेंडूत त्यांने टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आपले पहिले वहिले अर्धशतक झळकवले. शिवमच्या तुफानी फटकेबाजीमुळे कायरन पोलार्डही काही काळासाठी हबकला होता.

शिवमने ३० चेंडूत ५४ धावा ठोकल्या. ३ चौकार आणि ४ षटकारांची आतशबाजी करत त्याने विंडीजच्या गोलदांजाना चांगलाच घाम फोडला होता. शिवमच्या फटक्यांचा धसका घेऊन कायरन पोलार्डने एका ओव्हरमध्ये तीन वाईड बॉल टाकले. झालं असं की, नवव्या ओव्हरसाठी पोलार्ड गोलंदाजी करत होता. या ओव्हरमध्ये शिवमने २६ धावा काढल्या. ज्यामध्ये तीन षटकारांचा समावेश होता. शिवमला मोठी खेळी करण्यात अपयश आले असले तरी काही मिनिटांत त्याने भारतीय धावफलकाला गती देण्याचे काम केले.

- Advertisement -

शिवम दुबे हा मुंबईकर आहे. आयपीएलमध्ये तो विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंज बेंगलुरु या संघाकडून खेळलेला आहे. शिवमने १६ प्रथम दर्जाच्या सामन्यांतून ४८.१९ च्या सरासरीने १०१२ धावा केलेल्या आहेत. ज्यामध्ये दोन शतक तर सात अर्थशतकांचा समावेश आहे. शिवम ज्याप्रकारे षटकार मारतो, त्यामध्ये युवराज सिंहची झलक पाहायला मिळते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -