घरक्रीडाSRH vs MI : अभिषेक शर्माचे हैदराबादसाठी सर्वात वेगवान अर्धशतक; मुंबईविरुद्ध केला...

SRH vs MI : अभिषेक शर्माचे हैदराबादसाठी सर्वात वेगवान अर्धशतक; मुंबईविरुद्ध केला विक्रम

Subscribe

हैद्राबाद : सलामीवर ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि त्यानंतर हेनरिक क्लासेनच्या दमदार अर्धशतकी खेळीमुळे सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या केली आहे. हैदराबादने आपल्या डावात एकूण 18 षटकारांची बरसात केली आणि मुंबईला 278 धावांचे आव्हान दिले आहे. याचवेळी सलामीवीर अभिषेक शर्माने अवघ्या 16 चेंडूंत हैदराबादसाठी वेगवान अर्धशतक मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. याशिवाय तो आता मुंबईविरुद्ध वेगवान अर्धशतक मारणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. (SRH vs MI Abhishek Sharmas fastest fifty for Hyderabad A record against Mumbai)

हेही वाचा – SRH vs MI : अभिषेक शर्माचे हैदराबादसाठी सर्वात वेगवान अर्धशतक; मुंबईविरुद्ध केला विक्रम

- Advertisement -

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय किती चुकीचा आहे, ते हैदराबाद संघाने काही वेळातच दाखवून दिले. हैदराबादला मयांक अग्रवालच्या रुपात 45 धावांवर पहिला धक्का बसला यानंतर तिसऱ्या क्रमाकांवर आलेल्या अभिषेक शर्माने शानदार फलंदाजी करताना हैदराबादसाठी सर्वात वेगवान अर्धशतक केले. त्याने अवघ्या 16 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण करताना ट्रॅव्हिस हेड आणि डेव्हिड वॉर्नर यांना मागे टाकले आहे. अभिषेक शर्माने 23 चेंडूत 3 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 63 धावांची खेळी केली. याशिवाय अभिषेक शर्मा मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वात वेगवान अर्धशतक करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याने ऋषभ पंतचा विक्रम मोडला आहे. ऋषभ पंतने 18 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले होते.

- Advertisement -

मुंबईविरुद्ध सर्वात वेगवान अर्धशतक करणारे फलंदाज

14 – पॅट कमिन्स (केकेआर)- पुणे, 2022
16 – अभिषेक शर्मा (सनरायझर्स हैदराबाद), हैदराबाद, 2024
18 – ऋषभ पंत (दिल्ली कॅपिटल्स) – मुंबई, 2018
18 – ट्रॅव्हिस हेड (सनरायझर्स हैदराबाद) – हैदराबाद, 2024
19 – अजिंक्य रहाणे (चेन्नई सुपर किंग्ज)- मुंबई, 2023

हेही वाचा – SRH VS MI : हैदराबादने रचला धावांचा डोंगर, आयपीएलमधील सर्वाधिक धावसंख्या

सनरायझर्स हैदराबादसाठी सर्वात वेगवान अर्धशतक

16 – अभिषेक शर्मा विरुद्ध मुंबई इंडियन्स, हैदराबाद, 2024
18 – ट्रॅव्हिस हेड विरुद्ध मुंबई इंडियन्स, हैदराबाद, 2024
20 – डेव्हिड वॉर्नर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, हैदराबाद, 2015
20 – डेव्हिड वॉर्नर विरुद्ध केकेआर, हैदराबाद, 2017
20 – मॉइसेस हेन्रिक्स विरुद्ध आरसीबी, हैदराबाद, 2015
21 – डेव्हिड वॉर्नर विरुद्ध आरसीबी, बेंगळुरू, 2016

आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या

सलामीवर ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेनच्या दमदार अर्धशतकी खेळीमुळे सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या केली आहे. हैदराबादने आपल्या डावात एकूण 18 षटकारांची बरसात करताना 3 विकेट गमावत 277 धावा केल्या. याशिवाय हैदराबादने 10 षटकांत सर्वोच्च 148 धावा करण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -