घरक्रीडाSRH VS MI : हैदराबादने रचला धावांचा डोंगर, आयपीएलमधील सर्वाधिक धावसंख्या

SRH VS MI : हैदराबादने रचला धावांचा डोंगर, आयपीएलमधील सर्वाधिक धावसंख्या

Subscribe

हैद्राबाद : सलामीवर ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि त्यानंतर हेनरिक क्लासेनच्या दमदार अर्धशतकी खेळीमुळे सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या केली आहे. हैदराबादने आपल्या डावात एकूण 18 षटकारांची बरसात केली आणि मुंबईला 278 धावांचे आव्हान दिले आहे. (SRH VS MI Hyderabad’s highest score in IPL)

हेही वाचा – Shubman Gill : चेन्नईविरुद्धच्या पराभवानंतर गिलला धक्का; या कारणाने ठोठावला दंड

- Advertisement -

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय किती चुकीचा आहे, ते हैदराबाद संघाने काही वेळातच दाखवून दिले. अभिषेक शर्माने अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक झळकावले आणि तो हैदाराबदकडून सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. त्याने अवघ्या 23 चेंडूत 3 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 63 धावांची खेळी केली. त्याचवेळी सलामीवीर ट्रॅव्हिस हेडनेही अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक झळकावले. हेडने 24 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 62 धावांची खेळी केली.

- Advertisement -

ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्माच्या दमदार खेळीनंतर हेनरिक क्लासनेही मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. त्याने 34 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 80 धावांची नाबाद खेली केली. तर मार्करामने 28 चेंडूंत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 42 धावांचे योगदान दिले. त्यामुळे हैदराबादने 3 विकेट गमावत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली आणि मुंबई इंडियन्सला 278 धावांचे आव्हान दिले.

हैदराबादने मुंबईचा बदला घेतला

हैदराबाद संघाने अवघ्या 7 षटकांत 100 धावांचा आकडा पार केला आणि पुढच्या 3 षटकात आणखी 48 धावा जोडल्या. यासह हैदराबादने 10 षटकांत सर्वोच्च 148 धावा केल्या. यासह हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध बदला घेत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. 2021 मध्ये मुंबईने हैदराबादविरुद्ध 10 षटकांत सर्वाधिक 131 धावा करण्याचा विक्रम केला होता.

हेही वाचा – ED : पंतप्रधान मोदींचा नवा विचार; ईडीने जप्त केलेला पैसा सामान्यांना कसा परत करता येणार?

10 षटकात आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या

148/2 – सनरायझर्स हैदाराबाद वि. मुंबई इंडियन्स, हैदराबाद, 2024
131/3 – मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदाराबा, अबू धाबी, 2021
131/3 – पंजाब किंग्ज वि सनरायझर्स, हैदराबाद, 2014
130/0 – डेक्कन चार्जर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, मुंबई वानखेडे, 2008
129/0 – आरसीबी वि पंजाब किंग्ज, बेंगळुरू, 2016

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -