घरक्रीडाठाण्यात ‘रन फॉर वोट मॅरेथॉन’चे यशस्वी आयोजन

ठाण्यात ‘रन फॉर वोट मॅरेथॉन’चे यशस्वी आयोजन

Subscribe

ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी, तसेच ‘माईल्स टु गो’ यांच्या सहकार्याने काही दिवसांपूर्वीच ठाण्यात ‘रन फॉर वोट मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनमध्ये खासकरून युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत मतदान करण्याचा संदेश दिला.

ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते या मॅरेथॉनचे उद्घाटन झाले. ८०० धावपटूंचा सहभाग असलेली ही मॅरेथॉन स्पर्धा दहा किलोमीटर, ५ किलोमीटर आणि ३ किलोमीटर या तीन प्रकारांत पार पडली.

- Advertisement -

या मॅरेथॉनमध्ये विजया भट्ट, श्रद्धा राननावरे, नंदा शेट्टी, गुरुमूर्ती नायक, प्रशांत सारंग या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह ठाण्यातील नामवंत खेळाडू सहभागी झाले होते. आंतरराष्ट्रीय खेळाडू निलेश म्हसकर, गणेश प्रभुखोत आणि सुनीता औसेकर यांनी या मॅरेथॉनमध्ये पंचांची भूमिका पार पाडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -