Eco friendly bappa Competition
घर क्रीडा T20 world cup 2021: ENG VS SL इग्लंडने श्रीलंकेला दिले १६४ धावांचे...

T20 world cup 2021: ENG VS SL इग्लंडने श्रीलंकेला दिले १६४ धावांचे आव्हान

Subscribe

जोस बटलरच्या शतकीय खेळीच्या बदल्यात इग्लंडला प्रतिस्पर्धी संघाला १६४ धावांचे तगडे आव्हान दिले

टी २० विश्वचषकातील इग्लंड आणि श्रीलंकेमधील सामना फारच रोमांचक ठरत आहे. इग्लंडने पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करून २० षटकांत ४ बाद १६३ धावा केल्या. जोस बटलरच्या शतकीय खेळीच्या बदल्यात इग्लंडला प्रतिस्पर्धी संघाला १६४ धावांचे तगडे आव्हान दिले. जोस बटलरने सर्वाधिक ६७ चेंडूत १०१ धावांची शतकीय पारी खेळली. तर त्याच्या पाठोपाठ कर्णधार मॉर्गनने ३६ चेंडूत ४० धावांची सावध खेळी करून संघाला एका अपेक्षित धावसंख्येपर्यंत पोहचवण्यात हातभार लावला. इग्लंडच्या डावाची सुरूवात निराशाजनक झाली, जेसन रॉय अवघ्या ९ तर डेविड मलान केवळ ६ धावांवर बाद झाला. तर जॉनी बेअरस्टोला आपले खातेही उघडता आले नाही.

दरम्यान नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेकडून सुरूवातीला सावध गोलंदाजी पहायला मिळाली. श्रीलंकेचा गोलंदाज वानिंदू हसरंगाला सामन्यात ३ बळी घेण्यात यश आले. तर डावाच्या शेवटी चमेराने मॉर्गनचा बळी घेतला. हसरंगाला आणि चमेराला वगळता बाकी सर्व गोलंदाजांकडून निराशाजनक गोलंदाजी पहायला मिळाली. तर पहिल्या १० षटकांत सामन्यावर पकड बनविण्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांना यश आले होते. पण जोस बटलरच्या आक्रमक शतकीय खेळीच्या बदल्यात इग्लंडने अपेक्षित धावसंख्येपर्यंत मजल मारली.

- Advertisement -

इग्लंडचा संघ चालू विश्वचषकातील सर्वात यशस्वी संघ आहे. इग्लंडने आपल्या तीनही सामन्यात विजय मिळवून ग्रुप ए च्या गुणतालिकेत ६ अंकासह अव्वल स्थान मिळवले आहे.

 

- Advertisement -
- Advertisement -
MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -