घरक्रीडाT20 WC : हार्दिक पंड्याबाबत BCCI चा मोठा निर्णय, KKRच्या खेळाडूला मिळणार...

T20 WC : हार्दिक पंड्याबाबत BCCI चा मोठा निर्णय, KKRच्या खेळाडूला मिळणार संधी

Subscribe

आगामी विश्वकपासाठी भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) १५ खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. पण त्यातील काही खेळाडूंनी आयपीएलमध्ये निराशाजनक कामगिरी केल्याने त्यांच्या निवडीबाबत बीसीसीआयमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आगामी टी ट्वेंटी विश्वचषकाची सुरूवात येत्या १७ ऑक्टोबरपासून होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड बीसीसीआय द्वारे आयपीएल हंगामापूर्वीच करण्यात आली होती, पण त्या यादीतीलच काही खेळाडूंनी आयपीएल मध्ये निराशाजनक कामगिरी केल्याने बीसीसीआयच्या चितेंत वाढ झाली आहे, त्यामुळे संघात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान भारत हा थेट सुपर-१२ मध्ये उतरणाऱ्या संघामधील एक संघ असल्याने १५ ऑक्टोबरपर्यंत संघात बदल करू शकतो.

भारताचा ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पंड्या हा सतत दुखापतग्रस्त होत असल्यामुळे त्याच्या जागेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच चालू असलेल्या आयपीएल हंगामात देखील हार्दीक कडून निराशाजनक खेळी झाल्याचे निदर्शनास आले आहे, पण नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार भारतीय निवडसमिती हार्दीकला एक फलंदाज म्हणून संघात ठेवणार असून केकेआरकडून यंदा धमाकेदार खेळी करणाऱ्या व्यंकटेश अय्यरला अधिकचा फलंदाज खेळाडू म्हणून संघात सामिल करण्यात येऊ शकते.

- Advertisement -

पंड्या आणि अय्यर दोघेही संघात

भारताकडे विश्वचषकाच्या संघात बदल करण्यासाठी १५ ऑक्टोबर पर्यंत वेळ असल्याने पीटीआयच्या माहितीनुसार संघात एक बदल केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी हार्दीकला युएईमध्ये विश्वचषकाच्या संघात एक केवळ फलंदाज म्हणून खेळवले जाईल. तर बदल्यात केकेआरच्या व्यंकटेश अय्यरला युएईमध्ये पार पडलेल्या उर्वरीत सामन्यांतील धमाकेदार फलंदाजी आणि गोलंदाजीमुळे ऑलराउंडर रूपी पर्याय म्हणून संघात निवडले जाऊ शकते.

पंड्याकडे सध्या गोलंदाजीचा अभाव

हार्दीक पंड्या त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो, त्याच्याकडे गोलंदाजी करण्याची देखील क्षमता असल्याने भारतीय संघात ऑलराउंडरच्या भूमिकेत पंड्या चांगला पर्याय आहे, पण त्याच्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे पंड्या गोलंदाजी पासून दूर राहिला आहे, नुकत्याच चालू असलेल्या आयपीएलच्या हंगामात पंड्याने एकदाही गोलंदाजी केली नाही म्हणूनच गोलंदाजीला एक अतिरिक्त पर्याय म्हणून व्यंकटेश अय्यरची निवड होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

भारतातील विश्वचषकातील सामने –

१) भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
२) भारत विरुद्ध न्यूझीलँड (31 ऑक्टोबर)
३) भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
४) भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)
५) भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2 (8 नोव्हेंबर)


हेही वाचा : Dhoni : धोनीचा एक नंबरी निर्णय, BCCI च्या सचिवांकडून दुजोरा..!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -