घरक्रीडाT20 World Cup Prize Money: विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघावर पैशांचा पाऊस

T20 World Cup Prize Money: विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघावर पैशांचा पाऊस

Subscribe

ऑस्ट्रेलिया संघला आयसीसीकडून १२ करोड रुपये

आयसीसी टी२० विश्वचषक २०२१चा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँडमध्ये खेळला गेला. दुबईच्या मैदानावर हा शानदार सामना रंगला होता. या सामन्यात नाणेबाजीत पराभव स्वीकारुन न्यूझीलँडने फलंदाजी करत १७२ रन केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने २ विकेट गमावून शेवटच्या ओव्हर आधी जबरदस्त खेळ खेळत इतिहास रचला. मिचेल मार्थने ७७ धावा आणि डेविड वार्नरने ५३ धावा करत न्यूझीलँडचा पराभव केला. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलँडला हरवून आरोन फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाने आयसीसी टी२० विश्व चषकाचा किताब आपल्या नावे केला. पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया टीमने टी२० विश्व चषक ट्रॉफी जिंकली. ऑस्ट्रेलिया संघ जिंकल्याने टी२० क्रिकेटला एक नवा चँपियन मिळाला आणि ऑस्ट्रेलिया संघावर पैशांचा पाऊस पाडण्यात आला आहे. टी२० विश्व चषक फायनलमध्ये पराभव झालेल्या न्यूझीलँड संघाला देखील मोठी रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली.

टी२० विश्व चषक २०२१च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघला आयसीसीकडून १२ करोड रुपये बक्षिस स्वरुपात देण्यात आले. त्याचप्रमाणे उपविजेत्या न्यूझीलँड संघाला ६ करोड रुपये बक्षीस स्वरुपात देण्यात आले. तसेच उपांत्य फेरीत पराभव झालेल्या इंग्लंड आणि पाकिस्तान संघाला देखील आयसीसीकडून बक्षीस देण्यात आले आहे. पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलँडकडून इंग्लंडचा पराभव झाला तर ऑस्ट्रेलियाकडून पराभव झालेल्या पाकिस्तान संघाला आयसीसीकडून प्रत्येकी ३ -३ करोड रुपये देण्यात आले आहेत.  टी२- विश्व चषकात २०२१मध्ये टॉप चार  संघांना देखील मोठी रक्कम देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलाय. भारतीय संघाला तीन सामने जिंकल्यानंतर जवळपास १ करोड रुपये देण्यात आले आहेत.

- Advertisement -

टी २० विश्व चषक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाकडून विचित्ररित्या सेलिब्रेशन करण्यात आले. त्यांच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून ज्यात ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू चक्क बुटात बियर ओतून पिताना दिसत आहेत. अनेकांना हे खोटे वाटले मात्र आसीसीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवून सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर केला आहे. मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉइनिस हे दोघे बुटात बियर ओतून पिताना दिसत आहेत.


हेही वाचा – ICC best playing XI : आयसीसीची बेस्ट प्लेइंग इलेव्हन, कोणत्या खेळाडूंना स्थान ?

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -