Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा भारताच्या विजयानंतर गावसकरांचा आनंद गगनात मावेना, उड्या मारलेल्याचा व्हिडीओ व्हायरल

भारताच्या विजयानंतर गावसकरांचा आनंद गगनात मावेना, उड्या मारलेल्याचा व्हिडीओ व्हायरल

Subscribe

भारतीय संघानं टी-२० विश्वचषकाची सुरुवात दणक्यात केली. या सामन्यात विराट कोहली आणि हार्दिक पांड्या या सलामीवीर जोडीने उत्कृष्ट कामगिरी केली. भारतानं पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव केला. विराट कोहलीनं ८२ धावांची खेळी केली. तर हार्दिक पांड्यानं तीन विकेट आणि ४० धावांची कामगिरी केली. तसेच अर्शदीपने सुद्धा ३ विकेट्स घेतल्या. भारताच्या विजयात त्याचाही मोलाचा वाटा होता. भारतीय संघाच्या विजयानंतर संपूर्ण देशभरात जल्लोष साजरा करण्यात आला. दरम्यान, या विजयानंतर माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर, के श्रीकांत आणि इरफान पठाण यांनी जल्लोष साजरा केला.

सुनील गावसकरांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये सुनील गावसकरांच्या अंगात लहान मुलं संचारल्यासारखं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओत गावसकर लहान मुलांसारख्या उड्या मारताना दिसत आहेत. तसेच त्यांनी स्टेडियममधील व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यामध्ये इरफान पठाण आणि श्रीकांत यांच्यासोबत ते सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

या सामन्यात पाकिस्तानने भारताला विजयासाठी १६० धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सातव्या ओव्हरमध्ये ४ बाद ३१ अशी अवस्था झाली होती. परंतु पण विराट कोहली आणि हार्दिक पंड्यानं पाचव्या विकेटसाठी ११३ धावांची झुंजार भागीदारी रचली आणि या भागिदारीनं भारताला विजयाच्या दिशेने नेलं.


- Advertisement -

हेही वाचा : ‘किंग इज बॅक’ : भारताच्या विजयानंतर आयसीसीकडून रनमशीन कोहलीचा खास फोटो पोस्ट


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -