घरक्रीडाIND vs ENG : 'दबाव असणारच, पण आम्हाला फक्त...'; इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी रोहित शर्माचे विधान

IND vs ENG : ‘दबाव असणारच, पण आम्हाला फक्त…’; इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी रोहित शर्माचे विधान

Subscribe

टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताने प्रवेश केला आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने 71 धावांनी झिम्बाब्वेचा पराभव केला. त्यानंतर उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी रोहित शर्माने महत्वाचे विधान केले आहे.

टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताने प्रवेश केला आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने 71 धावांनी झिम्बाब्वेचा पराभव केला. त्यानंतर उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी रोहित शर्माने महत्वाचे विधान केले आहे. ‘प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून ती पार पाडण्याची गरज आहे. या सामन्यात फार दबाव असणार आहे. आम्हाला फक्त चांगलं खेळायचं आहे’, असे विधान रोहित शर्मा याने केले.

भारत आणि इंग्लंड या उपांत्य फेरीच्या सामन्याबाबत बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, “तेथील स्थितीशी लवकरात लवकर जुळवून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. इंग्लंड संघ आमच्यासाठी चांगले आव्हान आहे. ते चांगले क्रिकेट खेळत आहेत. दोन्ही संघांमधील सामना पाहण्यासारखा असणार आहे. आम्ही कशाप्रकारे इथपर्यंत पोहोचलो आहोत हे विसरु इच्छित नाही. प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून ती पार पाडण्याची गरज आहे. या सामन्यात फार दबाव असणार आहे. आम्हाला फक्त चांगले खेळायचे आहे. जर आम्ही त्या सामन्यात चांगले खेळलो तर पुढील सामन्यातही त्याचा फायदा होईल. आम्हाला लवकर जुळवून घेण्याची आणि त्याप्रमाणे योजना आणखण्याची गरज आहे”, असे रोहित शर्मा म्हणाला.

- Advertisement -

रविवारी झालेल्या भारत विरुद्ध झिम्बाब्वेच्या सामन्यात सूर्यकुमार यादव याने तुफानी फलंदाजी केली. सूर्यकुमार यादवने 25 चेंडूत 61 धावांची खेळी केली. दरम्यान, रोहित शर्माने कालच्या सूर्यकुमार यादवच्या खेळीवरही भाष्य केले. “आम्ही अष्टपैलू कामगिरी केली असून, याकडेच लक्ष होते. या सामन्याआधी आम्ही पात्र झालो असलो तरी आम्हाला अपेक्षेप्रमाणे खेळायचे होते. सूर्यकुमार यादव सध्या जबरदस्त कामगिरी करत आहे. इतर फलंदाजांवरील दबाव कमी केल्याने संघाला फायदा होत आहे. आम्हाला त्याची क्षमता माहिती असून, यामुळे इतर खेळाडूंवरील दबाव कमी होत आहे. तो प्रचंड आत्मविश्वासाने फलंदाजी करतो. आम्हाला त्याच्याकडून अशीच अपेक्षा आहे”, असे रोहित शर्माने म्हटले.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना रोहितला जास्त धावा करता आल्या नाही. परंतु, सूर्यकुमार यादवने 25 चेंडू नाबाद 61 आणि केएल राहुल 51 धावा केल्या. या दोघांच्या तुफानी खेळीवर भारतीय संघाने 20 षटकामध्ये 5 बाद 186 धावा केल्या. मात्र, झिम्बाब्वेचा संघ 115 धावातच आटोपला.

- Advertisement -

उपांत्य फेरीमधील 4 संघ निश्चित झाले आहेत. अ गटातून न्यूझीलंड आणि इंग्लंड तर ब गटातून भारत आणि पाकिस्तान हे 2 संघ टी-20 विश्वचषकाच्या उपांत फेरीमध्ये दाखल झाले आहेत.


हेही वाचा – सानिया मिर्जा आणि शोएब मलिक यांचा होणार घटस्फोट? सानियाच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -