घरमहाराष्ट्रअब्दुल सत्तारांची सुप्रिया सुळेंवर गलिच्छ भाषेत टीका, माफीसाठी राष्ट्रवादीने दिले 24 तास

अब्दुल सत्तारांची सुप्रिया सुळेंवर गलिच्छ भाषेत टीका, माफीसाठी राष्ट्रवादीने दिले 24 तास

Subscribe

मंत्र्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांप्रकरणी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. अशात विरोधकांकडून गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने शिंदे गटातील आमदारांवर 50 खोक्यांचा आरोप केला जात आहे. अशात अलीकडे सत्तेतील शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती. ज्यावरून राजकीय वातावरण चांगलेच पेटले, ही घटना ताजी असताना आता शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंवर टीका करताना अतिशय गलिच्छ भाषा वापरली आहे. सत्तारांच्या अभद्र भाषेवरून महाराष्ट्रभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अशा परिस्थितीत सत्तारांनी 24 तासात शब्द मागे घ्या, अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरणं अवघड होईल. अशा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. (shinde group mla abdul sattars tongue slipped npc mp supriya sule criticize offensive language)

अब्दुल सत्तार यांचे वादग्रस्त वक्तव्य

सुप्रिया सुळेंनी अलीकडे अब्दुल सत्तारांना 50 खोके मिळाले का, असा प्रश्न केला होता, ज्यावर सत्तारांनी तुम्हालाही द्यायचे का? असा प्रतिप्रश्न केला. सत्तारांच्या या प्रश्नाला प्रत्युत्तर देत सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, तुमच्याकडे 50 खोके असल्यानेच तुम्ही ऑफर करत असल्याची टीका पुन्हा केली. ज्यावर आज सत्तारांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुप्रिया सुळेंना शिवागाळ करत तुम्हालाही देऊ असे उत्तर दिले. सत्तारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच खवळले आहे, विरोधकांकडून सत्तारांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.

- Advertisement -

दरम्यान अब्दुल सत्तार हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. सत्तारांनी मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव खतगावकर यांनी अलीकडेच शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली होती, याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांनाही आक्षेपार्ह प्रश्न विचारल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा वाद उफाळून आला होता.

मात्र शिंदे गटातील आमदारांपैकी वादग्रस्त वक्तव्य करणारे अब्दुल सत्तार एकटेच नाहीत. अलीकडेच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचा नटी असा उल्लेख केला होता. तर शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हेही अनेकदा वादात सापडले आहेत. दरम्यान शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन तीन महिनेच झाले असताना त्यांचे मंत्रीच आता अडचणीत वाढ करत आहे. त्यामुळे मंत्र्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांप्रकरणी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.


इराणमधील हिजाबविरोधातील आंदोलनाचे लोण पोहचले भारतात; केरळमध्ये निदर्शने आणि जाळपोळ

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -