टी-20 विश्वचषकातील ‘हा’ संघ अद्याप अपराजित!

ऑस्ट्रेलियामध्ये सध्या सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकातील सामने अटीतटीचे होताना पाहायला मिळत आहे. विश्वचषकाच्या जेतेपदावर आपल्या संघाचे नाव कोरण्यासाठी सर्व संघ जोरदार सरावासह मैदानात उतरत आहेत. या टी-20 विश्वचषकात आतापर्यंत सर्वच संघांनी उत्तम कामगिरी करत सामन्यात अटीतटीची लढत दिली आहे.

second T20 match between India and South Africa

ऑस्ट्रेलियामध्ये सध्या सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकातील सामने अटीतटीचे होताना पाहायला मिळत आहे. विश्वचषकाच्या जेतेपदावर आपल्या संघाचे नाव कोरण्यासाठी सर्व संघ जोरदार सरावासह मैदानात उतरत आहेत. या टी-20 विश्वचषकात आतापर्यंत सर्वच संघांनी उत्तम कामगिरी करत सामन्यात अटीतटीची लढत दिली आहे. तसेच, या टी-20 विश्वचषकात जवळपास सर्वच संघांना धक्के बसले आहेत. मात्र एक संघ असा आहे की, जो अद्याप एकही सामना पराभूत झालेला नाही. हा संघ म्हणजे दक्षिण आफ्रिका. (t20 world cup South Africa team no loss single match in t20 world cup 2022)

टी-20 विश्वचषकाच्या ब गटात भारताचा एक पराभव झाला आहे. पाकिस्तानचे दोन पराभव झाले आहेत. बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांचेही या विश्वचषकात पराभव झाले आहेत. पण या गटातील दक्षिण आफ्रिकेच्या संघाला अजून एकही पराभव पत्करावा लागलेला नाही. दक्षिण आफ्रिकेचा पहिला सामना हा झिम्बाब्वेविरुद्ध झाला होता. या सामन्यात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे हा सामना रद्द करावा लागला. त्यामुळे दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.

त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा या विश्वचषकातील दुसरा सामना हा बांगलादेशविरुद्ध झाला होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशवर 104 धावांनी दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा या विश्वचषकातील तिसरा सामना हा भारताशी झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर अखेरच्या षटकात विजय मिळवला. त्यामुळे या विश्वचषकात अजूनपर्यंत एकही पराभव झालेला नाही.

ब गटाच्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका संघाला पाच गुण मिळाले असून, अव्वल स्थानावर विराजमान आहेत. त्यामुळे आता त्यांचे दोन सामने शिल्लक आहेत. या दोन सामन्यांमध्ये त्यांना एकतरी धक्का बसतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष असेल.


हेही वाचा – इंग्लंडचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत वाढ