इंग्लंडचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत वाढ

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० विश्वचषकाचा सामना पार पडला. या अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडवर २० धावांनी विजय मिळवला. इंग्लंडने ५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर मजल मारली आहे. परंतु इंग्लंडच्या विजयामुळे ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी २० ओव्हर्समध्ये ६ गडी बाद करत १७९ धावा इंग्लंडने केल्या. १७९ धावांचं आव्हान हे न्यूझीलंड संघासमोर देण्यात आलं. परंतु न्यूझीलंड संघ केवळ १५९ धावा करू शकला. त्यामुळे इंग्लंडने अखेरच्या पाच ओव्हर्समध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करत सामना २० धावांनी जिंकला. त्यामुळे उपांत्य फेरीसाठीच्या आशा इंग्लंडच्या जिवंत झाल्या आहेत.

इंग्लंडचा संघ गट एकमधून उपांत्य फेरी गाठण्याच्या शर्यतीत कायम आहे. आता न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे प्रत्येकी पाच गुण आहेत. ऑस्ट्रेलिया सध्या तिसऱ्या स्थानावर असून निव्वळ रन रेट -०.३०४ आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी अखेरच्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवणं खूप महत्त्वाचं आहे.

ऑस्ट्रेलियाचा पुढील सामना ४ तारखेला अफगाणिस्तानसोबत होणार आहे. तर इंग्लंडचा पुढील सामना श्रीलंकेसोबत ५ तारखेला होणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तानला पराभव करण्यात यशस्वी होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : भारताच्या सात्विक, चिरागची फ्रेंच ओपनमध्ये कमाल; चायनीज तैपेई जोडीचा पराभव करत मिळवले