घरक्रीडाभारतीय संघाच्या 'या' खेळाडूचे नशीब फळफळले, काहीही न करता बनला आयपीएल चॅम्पियन

भारतीय संघाच्या ‘या’ खेळाडूचे नशीब फळफळले, काहीही न करता बनला आयपीएल चॅम्पियन

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) 15 व्या पर्वातील नवा संघ गुजरात टायटन्सने (Gujarat Tiatans) पदार्पणातच आयपीएलचे जेतेपद (IPL Trophy) पटकावले आहे. धमाकेदार कामगिरी करत गुजरातने आयपीएलच्या चषकावर आपले नाव कोरले.

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) 15 व्या पर्वातील नवा संघ गुजरात टायटन्सने (Gujarat Tiatans) पदार्पणातच आयपीएलचे जेतेपद (IPL Trophy) पटकावले आहे. धमाकेदार कामगिरी करत गुजरातने आयपीएलच्या चषकावर आपले नाव कोरले. गुजरातच्या संघातील अनेक खेळाडूंनी आपले योगदान देत संघाला अंतिम फेरीपर्यंत नेले. मात्र, या सघात असे अनेक खेळाडू होते ज्यांची वैयक्तिक कामगिरी खूपच खराब होती, पण ते आयपीएल चॅम्पियन बनले. अशा खेळाडूंपैकी एक म्हणजे अष्टपैलू विजय शंकर. विजय शंकर (Vijay Shankar) या आयपीएलमध्ये 4 सामने खेळला आणि या चारही सामन्यांमध्ये तो फ्लॉप ठरला.

विजय शकरच्या फ्लॉप खेळीमुळे त्याला चार सामन्यांव्यतिरिक्त उर्वरित सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र एखाद्या खेळाडूला आपला खेळ नसला तरी नशिबाच्या जोरावर यश मिळवता येते आणि हेच यश विजय शंकरच्या वाटेला आले. विजया शंकरने फ्लॉप खेळी करूनही आयपीएलचे जेतेपदावर पटकावले.

- Advertisement -

हेही वाचा – IPL Winners List: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात दोन मोठे यशस्वी संघ, जाणून घ्या कोणी आणि किती वेळा जिंकली ट्रॉफी

सर्व सामन्यांमध्ये फ्लॉप

- Advertisement -

आयपीएलमध्ये विजय शंकरने 4 सामने खेळले आणि त्या सर्व सामन्यांमध्ये तो फ्लॉप ठरला. गुजरातच्या या अष्टपैलू (all-rounder) खेळाडूने 19 धावा केल्या. त्याची सरासरी 4.35 होती. गोलंदाजीसोबतच त्याची फंलदाजीतही कामगिरी खराब होती. विजय शंकरला 4 सामन्यात एकही यश मिळाले नाही.

हेही वाचा – खेळपट्टी आणि मैदान तयार करणाऱ्या क्यूरेटर्सना बीसीसीआयकडून बक्षीस जाहीर

24 च्या सरासरीने 731 धावा

विजय शंकरने आतापर्यंत 51 सामने खेळले आहेत आणि सुमारे 24 च्या सरासरीने 731 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याच्या खात्यात 9 विकेट जमा झाल्या आहेत. या पर्वात विजय शंकरला गुजरात टायटन्सने 1.4 कोटी रुपयांना खरेदी केले आहे.

एकेकाळी हार्दिक पांड्याचा बदली खेळाडू म्हणून विजय शंकरकडे पाहिले जात होते. हार्दिक पांड्या अनफिट असताना विजय शंकरला टीम इंडियात खेळण्याची संधी मिळायची. गुजरातमध्ये येण्यापूर्वी विजय शंकर सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग होता. तो प्लेइंग 11 चा नियमित सदस्य होता.


हेही वाचा – IND vs SA: दक्षिण आफ्रिका संघाला भारताचा ‘हा’ खेळाडू पडू शकतो भारी, यॉर्कर फेकण्यात आहे बादशाह

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -