Monkeypox : भारतातही मंकीपॉक्सचा धोका वाढला; अशाप्रकारे पसरतोय संसर्ग; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

सध्या भारतात मंकीपॉक्सचा एकही संशयित रुग्ण आढळला नाही. परंतु तरीही याकडे दुर्लक्ष करणे प्राणघातक ठरू शकते. त्यामुळे मंकीपॉक्सच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी लसीकरणावर अभ्यास सुरु आहे.

monkeypox threat in india know how the infection spreads
Monkeypox: भारतातही मंकीपॉक्सचा धोका वाढला; अशाप्रकारे पसरतोय संसर्ग

गेल्या काही वर्षांपासून जगभरात नवनव्या रोगांचा मानवाला सामना करावा लागतोय. या रोगांवर वैद्यकीय तज्ज्ञांकडूनही उपचार पद्धती शोधून काढल्या जात आहेत. यात दोन वर्षांपूर्वी कोरोना संसर्गाने सर्वांच्या आरोग्याला धोका निर्माण केला. अशात आता मंकीपॉक्स व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगभरातील 23 देशांमध्ये मंकीपॉक्सचा धोका वाढतोय. या देशांत मंकीपॉक्सचे सुमारे 257 रुग्ण आढळून आलेत तर 120 संशयित रुग्ण सापडलेत ही चिंतेची बाब आहे. दरम्यान ज्या देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले नाहीत अशा देशांमध्येही हा रोग मोठ्याप्रमाणात पसरतोय. दरम्यान मंकीपॉक्सचा संसर्ग लहान मुलांमध्ये आणि आजारी व्यक्तींमध्ये पसरत असून तो नंतर गंभीर स्वरुप घेऊ शकतो. (Monkeypox Virus)

MonkeyPox alert : कोरोनानंतर देशात मंकीपॉक्सचा धोका; ‘या’ राज्याकडून अलर्ट जारी

मंकीपॉक्स हा चेचक सारखाच एक दुर्मिळ विषाणूजन्य संसर्ग आहे. 1958 मध्ये संशोधनासाठी ठेवलेल्या माकडांमध्ये हा आजार प्रथम आढळला, एकेकाळी हा रोग माकडांमध्ये पसरला असल्याने त्याला मंकीपॉक्स असे नाव देण्यात आले. मानवामध्ये मंकीपॉक्सची पहिली केस 1970 मध्ये नोंदवली गेली. हा रोग प्रामु्ख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील उष्णकटिबंधीय पर्जन्य वनात आढळले, हा व्हायरस Paxviridae मधील एक आहे, ज्यामध्ये चेचक आजारास कारणीभूत विषाणून देखील समाविष्ट आहेत. (Monkeypox in India)

Monkeypox treatment : मंकीपॉक्स व्हायरसवर सापडलं औषध, लॅन्सेट रिसर्चमधून मोठा खुलासा

मंकीपॉक्सबाधित बहुतांश रुग्णांमध्ये ताप आणि पुरळ यांसारखी लक्षण आढळतात. मंकीपॉक्स देखील चेचक पेक्षा कमी संसर्गजन्य आहे. यामुळे होणाऱ्या समस्याही चेचकांपेक्षा कमी प्राणघातक असतात. त्याची लक्षणे दोन ते चार आठवडे दिसतात. तथापि, काही रुग्ण गंभीर होऊ शकतात. पुरळ दिसण्यापासून ते सर्व पुरळ पडण्यापर्यंत संक्रमित व्यक्ती संसर्गाचा बळी ठरू शकते. यामध्ये मृत्यूचे प्रमाण एक ते 10 टक्क्यांपर्यंत आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा आजार प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरू शकतो. प्राण्यांनी चावल्याने किंवा ओरखडे काढल्याने, प्राण्यांचे मांस, शरीरातील द्रवपदार्थ, जखमेशी संबंधीत थेट वस्तूंच्या संपर्कात आल्यास हा आजार पसरतोय. तसेच फाटलेली त्वचा, श्वसनमार्ग, डोळे किंवा नाक याद्वारे देखील एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये रोग पसरण्याचा धोका असतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या कपड्यांद्वारे देखील हा रोग दुसर्‍या व्यक्तीमध्ये संक्रमित होऊ शकतो. (Monkeypox Symptoms)

मंकीपॉक्सविषयी आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे महत्वपूर्ण वक्तव्य, म्हणाले …

सध्या भारतात मंकीपॉक्सचा एकही संशयित रुग्ण आढळला नाही. परंतु तरीही याकडे दुर्लक्ष करणे प्राणघातक ठरू शकते. त्यामुळे मंकीपॉक्सच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी लसीकरणावर अभ्यास सुरु आहे. सुरुवातीला कोरोना व्हायरसकडेही दुर्लक्ष करण्यात आले मात्र नंतर या व्हायरसने भीषण रुप धारण केले, ज्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. त्यामुळे भूतकाळातील चुकांमधून धडा घेत वेळीच सावध व्हायला हवे, कारण मंकीपॉक्स व्हायरस कधी भयंकर रूप धारण करु शकतो सांगता येत नाही.


Hardik Patel Will Join BJP: हार्दिक पटेल लवकरच भाजपात प्रवेश करणार, प्रवेशाची तारीखही ठरली