घरक्रीडान्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा

न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा

Subscribe

श्रीलंकेनंतर भारतात न्यूझीलंडचा संघ दौऱ्यावर येणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या लढत होणार आहे. अशातच या दोन्ही संघाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं याबाबतची घोषणा केली आहे.

श्रीलंकेनंतर भारतात न्यूझीलंडचा संघ दौऱ्यावर येणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या लढत होणार आहे. अशातच या दोन्ही संघाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं याबाबतची घोषणा केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा तर टी-ट्वेंटी मालिकेसाठी हार्दिक पांड्याला कर्णधार करण्यात आलं आहे. (team india squad for new zealand and austrailia tour of india)

न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या वनडे, टी-ट्वेंटी आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. श्रीलंकेविरुद्धची मालिका संपल्यानंतर आता दोन तगड्या संघासोबत भारतीय संघाचे सामने होणार आहेत. याशिवाय याच वर्षी विश्चचषक स्पर्धा होणार असल्यामुळे निवड समितीचे या मालिकांतील भारतीय संघाच्या कामगिरीवर विशेष लक्ष असणार आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे दोन्ही संघांविरुद्धच्या मालिकेसाठी खेळणार नाही.

- Advertisement -

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ‘या’ खेळाडूंची निवड

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, इशान किशन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, केएस भरत, शाहबाझ अहमद, जुझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक या खेळाडूंची वनडे मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

केएस भरत आणि शाहबाझ अहमद या निवेदित खेळाडूंना त्यांच्या जागी संधी देण्यात आली आहे.

न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी केएल राहुल आणि अक्षर पटेलला विश्रांती देण्यात आली आहे.

टी-20 मालिकेसाठी ‘या’ खेळाडूंना संधी

हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार या खेळाडूंचा संघ टी-ट्वेंटी मालिका खेळणार आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी पृथ्वी शॉ, शिवम मावी आणि मुकेश कुमार यांना संधी देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेसाठी या खेळाडूंची निवड

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा , मोहम्मद शामी, जयदेव उनादकट, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -