घर मनोरंजन लोक माझे फोटो काढतात... पोलिसांत जबाब नोंदवताना उर्फीचा माध्यमांवर ठपका

लोक माझे फोटो काढतात… पोलिसांत जबाब नोंदवताना उर्फीचा माध्यमांवर ठपका

Subscribe

सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद सध्या तिच्या कपड्यांमुळे वादात सापडली आहे. उर्फी सार्वजनिक ठिकाणीही अतिशय तोकड्या कपड्यात फिरते. यावरूनच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला टार्गेट केले आहे. मागील अनेक दिवसांपासून दोघींमध्ये सध्या सोशल मीडियावरून शाब्दिक वाद सुरु आहे. अशातच काही तासांपूर्वी मुंबई पोलिसांनी उर्फी जावेदला समन्स बजावल्याची बातमी समोर आली होती.अंबोली पोलिस ठाण्यात उर्फी जावेदची चौकशी होणार होती.

दरम्यान, नुकत्याच काही वेळापूर्वी उर्फी जावेदने अंबोली पोलिस ठाण्यात हजर राहून आपला जबाब नोंदवला. या जबाबात उर्फी म्हणाली की, “मी एक भारतीय नागरिक आहे. त्यामुळे इथे मला माझ्या आवडीचे कपडे परिधान करण्याचा, वागण्याचा आणि बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. हा अधिकार मला आपल्या राज्यघटनेने दिलेला आहे. मी माझ्या आवडीचे कपडे घातले आणि माझ्या कपड्यांवर माझ्या घरच्यांचा अजिबात विरोध नाही. मी माझ्या कामासाठी हे कपडे परिधान करते. त्यावरून माझं फोटो काढले जातात. मी कामात जेव्हा व्यस्त असते तेव्हा कधी कधी मला कपडे बदलण्याचा वेळ नसतो. त्याच वेळी कॅमेरे घेऊन आलेले लोक माझे फोटो काढतात. हेच फोटो व्हायरल होतात आणि हे व्हायरल फोटो मी थांबवू शकत नाही.” असा जबाब उर्फीने नोंदवला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

- Advertisement -

दरम्यान, शुक्रवारी उर्फी जावेदने महिला आयोगाकडे धाव घेत चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. यावेळी तिने रुपाली चाकणकर यांची भेट देखील घेतली. यावेळी उर्फीच्या वकीलांनी सांगितली की, भाजपा नेत्या चित्रा वाघ उर्फीला टार्गेट करत आहेत, तसंच तिला जीवे मारण्याची धमकी देखील देत आहेत.


हेही वाचा :

उर्फीला मुंबई पोलिसांकडून समन्स; चित्रा वाघांच्या तक्रारीची दखल

- Advertisement -
- Advertisement -
shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -