घरक्रीडातेजस चव्हाणची शतकी कामगिरी

तेजस चव्हाणची शतकी कामगिरी

Subscribe

कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या अ गटात ठाणे अ विभाग आणि माटुंगा अ विभाग यांच्यातील सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात तेजस चव्हाणने केलेल्या नाबाद १३६ धावांच्या जोरावर ठाणे संघाने पहिल्या डावात २७५ अशी धावसंख्या उभारली होती. पहिल्या फेरीच्या ८ साखळी सामन्यांतील हे एकमेव शतक ठरले. याला उत्तर देताना दुसर्‍या दिवसअखेर माटुंग्याची पहिल्या डावात ९ बाद २१५ अशी धावसंख्या होती. शतकवीर तेजसचीच सामनावीर म्हणून निवड झाली.

या स्पर्धेच्या क गटात ठाणे ब विभाग आणि माटुंगा ब’ विभाग यांच्यातील ठाण्याला पहिल्या डावात ७८ धावांची आघाडी मिळाली. ठाण्याकडून पहिल्या डावात ४ तर दुसर्‍या डावात ३ विकेट घेणार्‍या जय धात्रकला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

- Advertisement -

संक्षिप्त धावफलक

अ गट –
ठाणे अ विभाग : (पहिला डाव) ७३.३ षटकांत सर्व बाद २७५ (तेजस चव्हाण नाबाद १३६, साहिल जाधव ४९; आदित्य गिरी ५० धावांत ४ बळी) अनिर्णित वि. माटुंगा अ विभाग : (पहिला डाव) ८८ षटकांत ९ बाद २१५ (प्रिन्स सिंग ९७; अनुराग सिंग ४० धावांत ५ बळी, अथर्व डिखोळकर ६३ धावांत ३ बळी)

- Advertisement -

क गट –
ठाणे ब विभाग : (पहिला डाव ) ५९.१ षटकांत ९ बाद १८६ डाव घोषित (अथर्व विचारे ५०, अथर्व दातार नाबाद ४३; निसर्ग भुवड ५४ धावांत ४ बळी ) वि. माटुंगा ब विभाग : (पहिला डाव) २९.५ षटकांत ९ बाद १०८ (जय धात्रक २९ धावांत ४ बळी) आणि (दुसरा डाव) १७ षटकांत ४ बाद २७ (जय धात्रक ११ धावांत ३ बळी).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -