घरक्रीडाश्रीलंकेच्या खेळाडूने केला एकाच सामन्यात दोन द्विशतकांचा पराक्रम

श्रीलंकेच्या खेळाडूने केला एकाच सामन्यात दोन द्विशतकांचा पराक्रम

Subscribe

प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात केवळ दुसर्‍यांदाच एखाद्या खेळाडूने एकाच सामन्यात दोन द्विशतके करण्याचा पराक्रम केला आहे आणि हा पराक्रम करणार्‍या खेळाडूचे नाव आहे अँजेलो परेरा. नोनडेस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लबकडून खेळणार्‍या परेराने श्रीलंकेच्या स्थानिक स्पर्धेत सिंहलीज स्पोर्ट्स क्लबविरुद्धच्या सामन्यात हा पराक्रम केला.

२८ वर्षीय परेराने या सामन्याच्या पहिल्या डावात २०३ चेंडूंत २० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २०१ धावा केल्या, तर दुसर्‍या डावातही त्याने आपली कमाल दाखवत २६८ चेंडूंत २० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २३१ धावा केल्या.

- Advertisement -

परेराच्या आधी प्रथम श्रेणी क्रिकेट एका फलंदाजनाने एकाच सामन्यात दोन द्विशतके करण्याचा पराक्रम ८१ वर्षांपूर्वी इंग्लंडच्या आर्थर फॅगने केला होता. त्याने १९३८ साली इंग्लिश कौंटी केंटकडून खेळताना एसेक्सविरुद्धच्या सामन्यातील पहिल्या डावात २४४ आणि दुसर्‍या डावात नाबाद २०२ धावांची खेळी केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -