घरक्रीडाTokyo Olympics : ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये कोरोनाबाधित सापडणे अपेक्षितच, प्रमाण मात्र कमी; आरोग्य...

Tokyo Olympics : ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये कोरोनाबाधित सापडणे अपेक्षितच, प्रमाण मात्र कमी; आरोग्य तज्ज्ञांची माहिती

Subscribe

ब्रायन मॅक्लॉसकी ऑलिम्पिकदरम्यान आयोजकांचे आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहेत.

टोकियोमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिकला बऱ्याच आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा २३ जुलैला पार पडणार आहे. परंतु, त्याआधीच ऑलिम्पिक क्रीडानगरीत (Olympic Village) खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. परंतु, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) आणि जपानी आयोजकांनी चिंता करण्याची आवश्यकता नसल्याचे मत आरोग्य तज्ज्ञ ब्रायन मॅक्लॉसकी यांनी व्यक्त केले. ऑलिम्पिक क्रीडानगरीत कोरोनाबाधित सापडणार हे अपेक्षितच होते, पण त्याचे प्रमाण अपेक्षेपेक्षा खूप कमी असल्याचे मॅक्लॉसकी म्हणाले. ते ऑलिम्पिकदरम्यान आयोजकांचे आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहेत.

सातत्याने कोरोना चाचणी 

आम्हाला ज्याची अपेक्षा होती, तेच होत आहे. एखाद्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्यास ते त्वरित कळावे यासाठीच आम्ही सातत्याने कोरोना चाचणी करत आहोत. आम्ही कोरोनाची बाधा झालेल्या व्यक्तींची त्वरित इतरांपासून वेगळी व्यवस्था करतो. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका कमी होतो. ऑलिम्पिक क्रीडानगरीत कोरोनाबाधित सापडणार हे आम्हाला अपेक्षितच होते. परंतु, त्याचे प्रमाण अपेक्षेपेक्षा खूप कमी आहे, असे मॅक्लॉसकी यांनी नमूद केले.

- Advertisement -

…तर प्रादुर्भाव आपोआपच कमी

तसेच ऑलिम्पिक सुरु होण्याआधी किंवा ऑलिम्पिकदरम्यान खेळाडूंना कोरोनाची लागण होणारच नाही याची शाश्वती देणे अशक्य असल्याचे मॅक्लॉसकी म्हणाले. परंतु, ऑलिम्पिक क्रीडानगरी सुरक्षित आहे. सातत्याने चाचणी होत असल्याने कोरोनाबाधित व्यक्तीची ओळख पटणे लवकर शक्य होत असून संसर्गाचा धोका कमी होत आहे. त्यामुळे ऑलिम्पिकशी निगडित लोक क्रीडानगरीतच थांबल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव आपोआपच कमी होईल, असे मॅक्लॉसकी यांनी सांगितले. सोमवारी चेक प्रजासत्ताकच्या व्हॉलीबॉल खेळाडूचा, तसेच अमेरिकेच्या एका जिम्नॅस्टचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -