घरक्रीडाआदिवासी कबड्डी स्पर्धा

आदिवासी कबड्डी स्पर्धा

Subscribe

जय हनुमान वाघोडे संघाने आरसीएफ थळ आयोजित जिल्हास्तरीय कामगार स्मृती चषक आदिवासी कबड्डी स्पर्धेचे जेतेपद पटकावले. त्यांनी या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सुकेळी रोहा या संघाचा पराभव केला. जय सोंडाई प्रसन्न-पाली आणि काजव्याची वाडी यांनी अनुक्रमे तिसरा आणि चौथा क्रमांक मिळवला. जय हनुमानच्या दया नाईकला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. उत्कृष्ट पकडीचे पारितोषिक सुकेळी-रोहाचा सचिन जयवंत हंबीर याला, तर उत्कृष्ट चढाईचे पारितोषिक जय हनुमानचा अविनाश अशोक लेंडी याला देण्यात आले.

कुरुळच्या आर सी एफ क्रीडासंकुलात झालेल्या या स्पर्धेची अंतिम लढत जयान हनुमान वाघोडे आणि सुकेळी रोहा यांच्यात झाली. एकतर्फी झालेल्या या सामन्यात वाघोडे संघाने २३-७ अशी बाजी मारली. त्याआधी झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात सुकेळी रोहा संघाने काजव्याचीवाडी संघावर विजय मिळवला. तर दुसर्‍या उपांत्य लढतीत जय हनुमान वाघोडे संघाने जय सोंडाई प्रसन्न-पाली संघाचा पराभव केला.

- Advertisement -

आर सी एफ थळचे सीजीपी महाव्यवस्थापक एस.एम.दहीवले, मानव संसाधन मुख्य व्यवस्थापक सी .व्ही. तळेगांवकर, प्रशासन मुख्य व्यवस्थापक व्ही. जी. देशपांडे, प्रशासन वरिष्ठ व्यवस्थापक एस.डी.देशमुख यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

वैयक्तिक पारितोषिके

- Advertisement -

उत्कृष्ट पकड – सचिन जयवंत हंबीर, सुकेळी-रोहा
उत्कृष्ट चढाई – अविनाश अशोक लेंडी, जय हनुमान-वाघोडे
अष्टपैलू खेळाडू – श्री दया नाईक, जय हनुमान- वाघोडे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -