IPL 2022 : दुखापतीमुळे मुंबई इंडियन्सचा ‘हा’ खेळाडू आयपीएलमधून बाहेर

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वात 5 वेळा आयपीएलचे जेतेपद पटकवणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाला उत्तम कामगिरी करता आली नाही. या पर्वात मुंबईने केवळ एक विजय मिळवला असून, प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर गेला आहे.

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वात 5 वेळा आयपीएलचे जेतेपद पटकवणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाला उत्तम कामगिरी करता आली नाही. या पर्वात मुंबईने केवळ एक विजय मिळवला असून, प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर गेला आहे. या पर्वात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागत आहे. अशातच आता मुंबई इंडियन्सला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. परदेशी वेगवान गोलंदाज टायमल मिल्स दुखापतीमुळे उर्वरित आयपीएलला मुकणार आहे. टायमल मिल्सने मुंबईकडून खेळताना पाच सामन्यात सहा विकेट घेतल्या होत्या.

मुंबई इंडियन्सने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. टायमल मिल्स उर्वरित आयपीएलला मुकणार असल्यामुळे मुंबई इंडियन्सने दक्षिण आफ्रिकेच्या ट्रिस्टन स्टब्स याला उर्वरित सामन्यासाठी करारबद्ध केले आहे. यंदाच्या पर्वात मुंबईच्या संघाला 8 पराभवाचा सामना करावा लागला आहे.

टायमल मिल्स दुखापतीमुळे उर्वरित आयपीएलमधून बाहेर गेला आहे. त्याच्याजागी दक्षिण अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ट्रिस्टन स्टब्स याला करारबद्ध करण्यात आले आहे. 21 वर्षीय ट्रिस्टन स्टब्स याने नुकताच दक्षिण आफ्रिका ए संघात पदार्पण केले आहे. तो मध्यक्रम विस्फोटक फलंदाजी करतो.

स्टब्सने 17 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये 157.14 च्या स्ट्राईक रेटने 506 धावा चोपल्या आहेत. 20 लाख रुपयांच्या किंमतीमध्ये मुंबईने स्टब्सला खरेदी केले आहे. मिल्सला मुंबईने 1.50 कोटी रुपयात खरेदी केले होते.

मुंबईला 9 सामन्यात फक्त एक विजय मिळवता आला. मुंबईचा संघ गुणतालिकेत 10व्या क्रमांकावर आहे. मुंबईचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आलं आहे. त्यातच टायमल मिल्स दुखापतीमुळे आयपीलमधून बाहेर गेला आहे.


हेही वाचा – IPL 2022 : बंगळुरूचा दमदार विजय; पराभवामुळे चेन्नईला प्ले-ऑफमध्ये पोहचणं अशक्य