घरक्रीडाT20 world cup 2021 : मॅचचा 'सिक्सर ते फिक्सर', मोहम्मद आमीर- हरभजनमध्ये...

T20 world cup 2021 : मॅचचा ‘सिक्सर ते फिक्सर’, मोहम्मद आमीर- हरभजनमध्ये ‘ट्विट’वॉर

Subscribe

हरभजन सिंग आणि मोहम्मद आमिर ट्विटरवर आमनेसामने

टी २० विश्वचषकाच्या आपल्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला होता, विश्वचषकाच्या इतिहासातील पहिल्यांदाच पाकिस्तानला भारताविरूध्द विजय मिळवता आला आहे. या विजयानंतर पाकिस्तानचे आजी माजी खेळाडू सारखेच काही ना काही टिप्पणी करत आहेत. आणि ते भारतीय खेळाडूंना डिवचण्याचा प्रयत्न करताना पहायला मिळत आहे. सामना संपल्यानंतर तीन दिवसानंतरही या सामन्याच्या निमित्ताने टीका टिप्पणी सुरूच आहे. त्यातच पाकिस्तानच्या माजी गोलंदाजाने याबाबत भाष्य केले आहे, पाकिस्तानी संघाचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने ट्विटरवरून भारतीय संघाचा फिरकीपट्टू हरभजन सिंगला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच मोहम्मद आमिरच्या डिवचण्याला हरभजन सिंगने देखील चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.

- Advertisement -

मोहम्मद आमिरने ट्विटरवरून सांगितले की, “मला विचारायचे होते की हरभजन पाजीने आपला टीव्ही तर नाही फोडला ? शेवटी हा क्रिकेटचा खेळ आहे” यावर हरभजन सिंगने प्रत्युत्तर देतानाचे ट्विट केले की, “आता तुम्हीच बोलणार मोहम्मद आमिर, या षटकाराचे लँडिग तुमच्या घरावर तर नव्हते ना झाले ? शेवटी हा क्रिकेटचा खेळ आहे”, ट्विटरवर आपण मारलेल्या षटकाराचा व्हिडिओ पोस्ट करत त्याने मोहम्मद आमिरला चांगलेच प्रत्युत्तर दिले.

- Advertisement -

हरभजनच्या प्रभावी प्रत्युत्तरानंतर आमिरने भारत-पाकिस्तान कसोटी सामन्यातील व्हिडिओ शेय़र करत लिहले की, “मी थोडा व्यस्त होतो हरभजन सिंग. आपली गोलंदाजी बघत होतो, जेव्हा शाहिद आफ्रिदीने तुझ्या गोलंदाजीवर ४ चेंडूवर ४ षटकार लगावले होते. क्रिकेट मध्ये असे होऊ शकते, पण कसोटी सामन्यात हे जरा जास्तच झाले. आमिरच्या आक्रमक भाषेनंतर हरभजनसिंगचा राग अनावर झाला, त्याने मोहम्मद आमिरला मॅच फिक्सिंग संबोधले, त्याने ट्विटरवरून टिप्पणी केली की, “लॉर्डस मध्ये नो बॉल कसा झाला होता ? किती घेतले आणि कोणी दिले ? कसोटी सामना आहे नो बॉल कसा होऊ शकतो ? या चांगल्या खेळाला बदनाम केल्याबद्दल तुमची लाज वाटते अशा शब्दांत हरभजनने आमिरला चांगलीच त्याची लायकी दाखवून दिली.


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -